Claim
कापूर जाळल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो
दाव्याचे संक्षिप्त विवरण– सध्या सोशल मीडियामध्ये कोरोना व्हायरस बद्दल अनेक पोस्ट व्हायरल होत आहे. या व्हायरसवर अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपायाच्या पोस्ट देखील व्हायरल होत आहे. अशीच एक पोस्ट फेसबुक वर आढळून आली ज्यात म्हटले आहे की, कापुर जाळल्याने कोरोनाचा विषाणू नष्ट होतो.
Verification
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला यासंदर्भात जास्त माहिती आढळून आली नाही. मात्र दैनिक सकाळच्या वेबसाईटवर एक बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की कोरोना व्हायरस वर केमिकल नव्हे तर आयुर्वेदिक भीमसेनी कापूर उपयुक्त आहे. बातमीत म्हटले आहे की वैद्य सुभाष वडोदेकर यांनी सांगितले की, वनस्पती पासून तयार करण्यात आलेला आयुर्वेदिक भीमसेनी कापूर हवेतील जंतू नष्ट करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो.बाजारात मिळणा-या कापुरात केमिकल असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोरोना सारखा व्हायरस किंवा हवा शुद्ध होण्याचे प्रमाण कमी असते.

याबाबत आम्ही पुढे शोध सुरु ठेवला. याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर काही माहिती मिळते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला कोरोना व्हायरसपासून कसा बचाव करावा याची माहिती देण्यात आलेली आढळून आली. मात्र कापूराच्या उपायाबद्दल कोणतीही माहिती आढळून आली नाही.

यानंतर आम्ही जागतिक आरोग्य संंघटनेच्या (WHO) वेबसाईटवर याबाबत शोध घेतला मात्र आम्हाला कोरोना व्हायरसवर कापूर किंवा तशा प्रकारचा उपाय सुचविल्याचे किंवा असल्याचे आढळून आले नाही.

यावरुन हेच स्पष्ट होते की, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी कापूर जाळणे उपयुक्त आहे याचे समर्थन केलेले नाही. तसेच कोणत्याही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपायाचे देखील समर्थन केलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियात कापूर जो दावा करण्यात येत आहे तो भ्रामक असल्याचे सिद्ध झाले आहे.
Tools Used
Facebook Search
Google Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)