Claim–
चीनमधील लोक तब्येत सुधारण्यासाठी लहान बाळांना शिजवून त्याचे सूप पीत आहेत.
Verification–
सध्या चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरस ने अनेक देशांत थैमान घातले आहे. या व्हायरस विषयी अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट आम्हाला फेसबुक वर आढळून आली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की चीनमधील लोग आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून जिंवत बाळांना शिजवून त्याचे सूप पीत आहेत.
या संदर्भात आम्हाला एक ट्विट देखील आढळून आले.
याशिवाय काही फेसबुक पोस्ट देखील आढळल्या.
आम्ही या संदर्भात शोध सुरु ठेवला असता आम्हाला मागील वर्षी
theinfotainmentexpress.com या वेबसाईटवर प्रकाशित झालेला आणि हाच दावा असणारा लेख आढळून आला. यात म्हटले आहे की चीनी लोक आरोग्य चांगले होण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढण्यासाठी ह्यूमन बेबी सूप पीत आहेत.
आम्ही व्हायरल फोटोंची सत्यता पडताळूण पाहण्यासाठी यांडेक्स इमेजचा आधार घेतला असता या फोटोचे अनेक परिणाम दिसून आले.
याच शोधा दरम्यान आम्हाला दोन वर्षांपूर्वी
liveabout.com वेबसाईटवर प्रकाशित आर्टिकल आढळून आले यात म्हटले आहे की खरंच चीनमध्ये लहान बाळांचे मांस खाल्ले जाते का. या आर्टिकलमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या इसमाचा फोटो आहे. त्यामुळे आम्ही हे आर्टिकल बारकाईने वाचले तर यामध्ये कळले की हा फोटो चीनच्या शांघायमधील Zhu Yu या आर्टिस्टचा आहे. आम्ही याबाबत शोध घेतला असता
https://www.taipeitimes.com या वेबसाईटवर 2001मध्ये प्रकाशित झालेला लेख आढळून आला यात म्हटले आहे की, शांघायमधील Zhu Yu या आर्टिस्ट ने गर्भपातातून मृत झालेल्या 6 महिन्यांच्या अर्भकाला शिजवून खाल्ले होते तो एका आर्टचा भाग होता. आर्टिस्टच्या म्हणण्यानुसार पारंपारिक आचाराला हे एक आव्हान होते.
याशिवाय आम्हाला Zhu Yu च्या मुलाखतीचा 2012 मधील एक व्हिडिओ यूट्यूबवर आढळून आला. यात तो म्हणतो की, “कोणताही धर्म नरभक्षकांना प्रतिबंधित करीत नाही. तसेच मला लोक खाण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदाही मला सापडत नाही. मी नैतिकता आणि कायदा यांच्यातील पोकळीचा फायदा घेतला मी हा प्रयोग केला. या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला आहे की मेडिकल काॅलेजमधून चोरी केलेले मृत अर्भक यासाठी वापरले होते.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सध्या चीनी लोक आरोग्यात सुधारणा होण्यासाठी लहान बाळांच्या मांसाचा आहारामध्ये वापर करत नाहीत तर 19 वर्षांपूर्वी एका चीनी आर्टिस्ट ने अर्भक शिजवून खाल्ल्याचा फोटो आजच्या संदर्भात व्हायरल करुन भ्रामकता निर्माण केली जात आहे.
Sources
Facebook Search
Twitter Advanced Search
Google Search
Yandex Image
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)