Claim–
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी पोलिसांवर दगडफेक करत आहेत.
Verification –
Geetika Swami नावाच्या ट्विटर हॅंडलवर दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ सुरु असलेल्या आंदोलनाची व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. यात दावा केला आहे की, जामियाचे विद्यार्थी पोलिसांवर दगडफेक करत आहेत. पोलिसांनी मूकपणे हे सगळे सहन करायचे का. जामिया मिलिया हिंदुत्व भारतासाठी लढ़त आहे का ? असा प्रश्नही या ट्विटमध्ये विचारण्यात आला आहे.
आम्ही काही कीवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला काही बातम्या आढळून आल्या.
आम्हाला इंडिया टूडेच्या वेबसाईटवर 15 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, दिल्ली पोलिससांनी रविवारी जामिया मिलिला इस्लामिया विद्यापीठात सीएएच्या विरोधा आंदोलनादरम्यान हिंसक कारवाया करणा-या आंदोलकांवर कड़कर कारवाई केली. पूर्व दिल्लीचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की आम्ही कोणत्याही विद्यापीठाच्या विरोधात नाही मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही संतप्त लोकांना पांगवले मात्र पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. आमच्यावर दगडफेक करणारे लोक कोण आहेत हे प्राॅक्टरने शोधून काढावेत.
याशिवाय आम्हाला रिपब्लिक टिव्हीच्या बातमीचा व्हिडिओ देखील आढळून आला. यात आंदोलकर्ते दगडफेक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ देखील डिसेंंबर 2019 मध्ये अपलोड करण्यात आला आहे.
यावरुनच हेच सिद्ध होते की सोशल मीडियात सध्या व्हायरल होत असलेला जामिया मिलिया विद्यापीठाबाहेरील दगडफेकीचा व्हिडिओ डिसेंबर 2019 मधील आहे. सध्या अशी कोणतीही निदर्शनास आलेली नाही.
Soures
Twitter Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)