दावा– मुंबई आणि पुण्यात लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे.

दाव्याचे संक्षिप्त विवरण– मुंबई आणि पुण्यात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी लष्कराला पाचारण करणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. यात म्हटले आहे की शनिवारपासून 10 दिवस ही शहर लष्कराच्या ताब्यात असतील या दरम्यान सर्व काही बंद असेल. त्यामुळे किराणा भाजीपाला साठवून ठेवा. या कडक लाॅकडाउनच्या काळात फक्त औषधे आणि दूध उपलब्ध असेल.
पडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता याच दाव्याचे एक ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की 10 दिवसांसाठी दोन्ही शहरे लष्कराच्या ताब्यात असतील, याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रात्री आठ वाजता राज्याला संबोधित करणार आहेत.
याशिवाय आम्हाला एक फेसबुक पोस्ट देखील आढळून आली यात देखील हाच दावा करण्यात आला आहे.
काही यूजर्सनी हे खरे आहे का याबद्दल देखील प्रश्न विचारला आहे.

याबाबत आम्ही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण मुख्य प्रवाहातील माध्यमांत अशा प्रकारची बातमी आढळून आली नाही. मात्र शुक्रवारी ( 8 मे ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना व्हायरसची सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना याबद्दल यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून माहिती दिली. याचा व्हिडिओ उपलब्ध आहे व्हिडिओ सुरु झाल्यापासून 6 मिनटे 6 सेंकदापासून ते 6 मिनटे 20 सेकंदा पर्यंत ते मुंबईत लष्कराला पाचारण करण्याबाबत खुलासा करताना दिसतात ते म्हणतात की, “गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सैन्य तैनात केले जाईल अशी अफवा आहे आणि तेथे टाळेबंदी होईल व सर्व दुकाने बंद ठेवली जातील. सैन्याची काय गरज आहे? मी आतापर्यंत जे काही केले ते तुमच्यावर विश्वास ठेवून केले आहे. ”
https://www.youtube.com/watch?v=MmX1JbTN08Y
याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मुंबईत लष्कराला पाचारण करणार नसल्याचे ट्विट देखील केले आहे
मुंबई पोलिस आयुक्तांनी देखील अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत लष्कराला पाचारण करणार नसल्याचे स्पष्ट झाले पण पुण्याबाबत नेमकी माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता 8 मे रोजी दैनिक पुढारीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की पुण्यात लष्कराला पाचारण करण्याची अफवा पसरविणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शहराचे सहपोलिस आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे यांनी दिली आहे. याशिवाय दैनिक लोकमतने देखील याबाबत वृत्त दिले आहे.

यावरुन हेच स्पष्ट होते की मुंबई आणि पुण्यात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याची अफवा सोशल मीडियात व्हायरल झालेली होती. सोशल मीडियात करण्यात आलेला दावा असत्य आहे.
Source
Twitter Facebook,
Google Search
Result-Fabricated News/ False content
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)