हिंदू व्यक्तीच्या अंत्ययात्रेला मुस्लिमांनी खांदा दिल्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, पुण्यातील रमांकांत जोशी यांचे कोरोनोनाने निधन झाले खांदा देण्यासाठी कुणी पुढे आले नाही, मात्र तबलगी जमातच्या लोकांनी त्यांच्या अंत्ययात्रेस खांदा दिला.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज परत पुण्यामध्ये MBBS Dr वय 79 रमाकांत जोशी हे कोरोना ने मृत झाले एक मुलगा आहे पन तो अमेरिकेत Dr आहे आणि पत्नी वृध्द आहे वय 74 आणि Dr ची ईच्छा होती की मी 4 लोकांच्या खांद्यांवर जाईल परंतु कोरोनो असल्यामुळे कोणीही नातेवाईक भाऊबंद जवळ यायला तयार नाही ही घटना तब्लिग चे काम करणारे मुस्लिम युवककानां माहित पड़ली आणि मग सर्व व्यवस्था करुँन खांद्यावर स्मशानभुमी पर्यंत नेउन अंतिंम सन्स्कार केले

Fact Check / Verification
पुण्यातील रमांकांत जोशी यांच्या पार्थिवाला मुस्लिम युवकांनी खरंच खांदा दिला का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच शोधा दरम्यान आम्हाला फेसबुकवर याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.


आम्ही रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने व्हायरल फोटो नेमका कुठला आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता अभिनेता एझाज खान यांनी 28 एप्रिल 2020 रोजी हा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केल्याचे आढळून आले. मेरठमधील रमेशचंद्र माथुर यांच्या अंत्ययात्रेचा हा फोटो खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
याशिवाय आम्हाला Times of India ची बातमी देखील आढळून आली. यात म्हटले आहे की, मेरठमध्ये उपवास करणार्या मुस्लिम पुरुषांनी 68 वर्षीय रमेश माथुर या हिंदू पुजार्याच्या अंत्ययात्रेस खांदा दिला.

याशिवाय अमर उजाला या हिंदी दैनिकात देखील ही बातमी प्रसिद्ध झाली होती. यात देखील रमेश माथुर यांच््यावर मुस्लिमांनी अत्यसंस्कार केल्याचे म्हटले आहे.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटो हा पुण्यातील रमाकांत जोशी यांच्या अंत्ययात्रेचा नसून मेरठमधील पुजारी रमेश माथुर यांच्या अंत्ययात्रेचा आहे. कोरोनाकाळात त्यांना कुणीच खांदा न दिल्याने मुस्लिमांनी त्यांना खांदा दिला. तोच फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Result- Misleading
Sources
टाईम्स आॅफ इंडिया- https://timesofindia.indiatimes.com/city/meerut/uttar-pradesh-fasting-muslim-men-take-out-funeral-procession-of-hindu-priest-in-meerut/articleshow/75463072.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.