Claim–
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅक डाऊन दरम्यान रोज एक तास वाईन शाॅप्स उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
दाव्याचे संक्षिप्त विवरण-
देशात 21 दिवसांचा लाॅक डाऊन जाहिर झाला असून अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी राहणार असल्याचे सरकारने सांगितले आहे मात्र सोशल मीडिया मध्ये टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या बातमीचा स्क्रीनशाॅट व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो असून वाइन शाॅप दुपारी 3 ते 4 पर्यंत चालू ठेवण्याच निर्णय असा मजकूर लिहिलेला आहे.
Verification–
लाॅकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारने खरंच असा काही निर्णय घेतला आहे का याची आम्ही पडताळणी सुरु केली. याच दरम्यान आम्हाला एक ट्विटमध्ये हा स्क्रीनशाॅट शेअर केल्याचे आढळून आले.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या स्क्रीनशाॅट्संदर्भात आम्ही शोध सुरुच ठेवला असता असता आम्हाला
दैनिक सकाळमध्ये 20 मार्च रोजी प्रकाशित करण्यात आलेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने राज्यातील वाईन शाॅप्स आणि दारुची दुकाने 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा व्हिडिओ देखील आढळून आला. यात म्हटले आहे की राज्यातील वाइनशाॅप्स दारुची दुकाने 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. या आदेशाचे कुणी उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
आमच्या पडताळणीमध्ये टिव्ही 9 बातमी दिल्याचे आढळून आले नाही. स्क्रीनशाॅटमधील मजकुरातही ब-याच चुका आहेत त्यामुळे एक फोटोशाॅप्ड इमेज आहे हे उघड झाले. यावरुन हेच स्पष्ट होते की राज्यात 31 मार्च पर्यंत दारु आणि वाईनची दुकाने बंद असणार आहेत. सरकारने दुपारी 3 ते 4 वाजेपर्यत दारुची दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलेला नाही.
Source
Google Keyword Search
Twitter Advanced Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)