दावा
विलगीकरण कक्षात डान्स करणा-या लोकांचा व्हिडिओ मुंबईतील आहे.
कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात लुंगी डान्स या हिंदी गाण्याच्या तालावार लोक नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा करण्यात आला आहे का हा व्हिडिओ मुंबईतील विलगीकरण कक्षात रुपांतरित करण्यात आलेल्या नॅशनल स्पोर्टस् क्लब आॅफ इंडिया (NSCI) येथील आहे.

पडताळणी
आम्ही या व्हायरल दाव्याची पडताळणी सुरु केली. या शोधा दरम्यान भाजपचे नेते नीतेश राणे यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केल्याचे आढळून आले. यात त्यांनी या संगळ्यांवर कोण नजर ठेवणार ही नाईट लाईफ आहे का? असा प्रश्न देखील विचारला आहे.
या संदर्भात आणखी शोध सुरु ठेवला असता राणे यांच्या ट्विटर उत्तर देणारे बीएमसीचे एक ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की हा व्हिडिओ मुंबईतील NSCI किंवा बॅडमिंटन हाॅलचा नाही.
बीएमसी ने आणखी एका ट्विटमध्ये हा व्हिडिओ त्रिपुरा येथील असल्याचे म्हटले आहे.
याबाबत आम्ही काही किवर्डसच्या आधारे हा व्हिडिओ त्रिपुरा येथील आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडिओ त्रिपुरातील एका युटयूब चॅनलवर आढळून आला. यात हा व्हिडिओ त्रिपुरातील हपनिया येथील विलगीकरण कक्षातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय त्रिपुराचे मुख्यमंत्री विपल्ब कुमार देव यांनी देखील हपनिया येथ विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आल्याचे ट्विट केलेले आढळून आले.
यावरुन हेच स्पष्ट होते की त्रिपुरा येथील विलगीकरण कक्षातील डान्सचा व्हिडिओ मुंबईच्या नावाने व्हायरल झाला आहे.
Source
Twitter YouTube Google Search ,
Result- Misleading