दावा- व्हायरल व्हिडिओ पुण्यातील भांडारकर रोडवरील वाईन शाॅपसमोर वाईन खरेदीसाठी महिलांंची रांग लागल्याचा आहे.
सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक वाईनशाॅप समोर पुरूष आणि महिला देखील दिसत आहे मात्र महिलांची वेगळी रांग आहे. दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ लाॅकडाऊनमध्ये मद्य विक्रीला परवानगी मिळाल्यानंतरचा असून पुण्यातील भांडारकर रोडवरील एका वाईनशाॅपसमोर वाईन खरेदीसाठी महिलांनी अशी रांग लावली होती.
पडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. याबाबतीत शोध घेतला असता फेसबुक वर याच दाव्याच्या पोस्ट आढळून आल्या.

मुख्य माध्यमांमध्ये पुण्यात वाईनशाॅप समोर महिलांची रांग लागल्याची बातमी आढळून आली नाही. आम्ही व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला असता यात U Wines @ MRP या वाईनशाॅप शेजारील एका दुकानावार कन्नड भाषेत बोर्ड असल्याचे दिसून आले.

पुण्यात कन्नड भाषेत बोर्ड असणे ही बाब शंका निर्माण करणारी होती. शिवाय या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कन्नडमध्ये बोलत असल्याचे आढळून आले. तसेच एक व्यक्ती इंडियन एक्सप्रेस असे सांगत असल्याचे देखील एेकू येते. यावरुन आम्ही काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला kannadaprabha.com या वेबसाईटवरील बातमीमध्ये हा फोटो दिसून आला.

यात द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचा उल्लेख असल्याने आम्ही याबाबत शोध घेतला असताThe News Indian Express नावाच्या दैनिकात 5 मे रोजी हा फोटो प्रसिद्ध झाल्याचे आढळून आले.

याच वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की हा व्हिडिओ पुण्यातील नसून बेंगळुरूमधील आहे. सोशल मीडियात भ्रामक दाव्याने व्हायरल होत आहे.
Source
Facebook, Twitter
Result- Misleading/ Partly False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)