दावा
कोविड-19 संदर्भात सावधगिरी बाळगण्याची माहिती देणारी महिला मेदांता हाॅस्पिटलमधील वरिष्ठ डाॅक्टर आहे.
सोशल मीडियात एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यात ती महिला कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याची माहिती देत आहे. दावा करण्यात येत आहे की, ही महिला मेदांता हाॅस्पिटलमध्ये वरिष्ठ डाॅक्टर आहे. व्हिडिओमध्ये सदर महिला कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी गरम पाण्याने गुळण्या करणे, दिवसांतून दोन तीन वेळा चहा पिणे आदि कृती करण्याच्या सुचना देत आहे.

पडताळणी
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता फेसबुकवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्याचे आढळून आले.

सदर महिला खरचं मेदांता हाॅस्पिटमधील ज्येष्ठ डाॅक्टर आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी आम्ही मेदांता हाॅस्पिटलच्या वेबसाईटला भेट दिली पण डाॅक्टरांच्या यादीमध्ये सदर महिलेचा फोटो आढळून आला नाही. याबाबत अधिक तपास सुरु केला असता आम्हाला वेदांता हाॅस्पिटलच्या फेसबुक पेजवर 12 जून रोजी शेअर करण्यात आलेली एक पोस्ट आढळून आली. यात म्हटले आहे की व्हायरल व्हिडिओमधील महिला ही वेदांता हाॅस्पिटलमधील डाॅक्टर नसून ह्या खोट्या शिफारशी करणा-या या व्हिडिओचा हाॅस्पिटलचा कोणताही संबंध नाही. लोकांना हा व्हिडिओ शेअर करु नये व इतरांना देखील याबाबत माहिती द्यावी.
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओतील महिला ही वेदांता हाॅस्पिटलची वरिष्ठ डाॅक्टर नसून कोविड-19 पासून बचावासंदर्भात चुकीची माहिती देत आहे. सदर महिला नेमकी कोण आहे याची माहिती आम्हाला मिळालेली नाही. याबद्दल माहिती मिळताच लेख अद्ययावत करण्यात येईल.
Source
Facebook, Google Search
Result- Fabricated News
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)