Claim- छत्तीसगडमध्ये पेंड्रा मारवाही जिल्ह्यामध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियामध्ये पावसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ छत्तीसगडमधील पेंड्रा मारवाही जिल्ह्यातील असून अशा प्रकारचा पाऊस काश्मीर आणि पंजाबमध्ये देखील पडतो. त्यावेळी लोकांना बंकरमध्ये लपावे लागते या पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले.
Verification – आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलवर काही कीवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला हाच दावा असणारे अनेक ट्विट्स आणि फेसबुक पोस्ट आढळून आल्या.
काही ट्विटर हॅंडल्सवर हा गारपीटीचा व्हिडिओ व्हियतननामधील असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात आम्हाला एक 24 एप्रिल रोजी अपलोड केलेला यूट्यूब व्हिडिओ देखील आढळून आला.
हा व्हिडिओ भारतातील वेगवेगेळ्या राज्यांच्या नावाने सोशल मीडियात 22 एप्रिल पासून व्हायरल होत असल्याचे दिसून आले. यात गारपिटीचा आवाज बंदुकीन केलेल्या हल्ल्यासारखा असल्याचे दिसून येेते त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. आम्ही या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे. याचा शोध घेण्यासाठी आमची पडताळणी सुरु केली. 22 एप्रिलपूर्वी हा व्हिडिओ कुणी शेअर केला आहे का याबाबत तपासणी सुरु केली यासाठी वेगवेगळ्या किवर्ड्सचा वापर केला. याच दरम्यान आम्हाला युट्यूब वर 19 एप्रिल रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ आढळून आला.
या व्हिडिओमध्ये@diwakarbartaula या टिकटाॅक यूजरचा आयडी असल्यामुळे आम्ही त्या यूजरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला टिकटाॅकवर हा व्हिडिओ आढळून आला तो 18 एप्रिल रोजी अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ही गारपीट नेपाळ मधी चितवन येथील असल्याचे म्हटले आहे. https://vm.tiktok.com/vKQPX6/
आम्ही काही किवर्डसच्या आधारे या संदर्भात शोध घेतला असता हा व्हिडिओ Aajtaknepalnews च्या फेसबुक पेजवर आढळून आला. यात म्हटले आहे की ही गारपीट चितवन मध्ये झाली आहे.
आणखी हाच दावा करणारा एक व्हिडिओ आढळून आला. याशिवाय आम्हाला या संदर्भात नेपाळमधील चितवन परिसरात गारपीट झाल्याची बातमी आढळून आली.
यावरुन हेच स्पष्ट होते की, की भारतातील विविध राज्यांच्या तसेच व्हियतनामच्या नावाने व्हायरल झालेला व्हिडिओ हा प्रत्यक्षात नेपाळमध्ये 18 एप्रिल रोजी झालेल्या गारपिटीचा आहे. सोशल मीडियात तो भ्रामक दाव्यानिशी व्हायरल झाला आहे.
Source
Facebook
Facebook , Twitter, Youtube, Google
Result- False connection/Incorrect Tiitle
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)