Tuesday, April 15, 2025
मराठी

Fact Check

Fact Check: कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमारांनी घेतले टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन? खोटा आहे हा दावा

Written By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
May 27, 2023
banner_image

Claim
कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमार यांनी टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन घेतले.
Fact
शिवकुमार यांचा २०१९ मधील फोटो चुकीच्या संदर्भाने व्हायरल करण्यात येत आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यावर हे दर्शन घेतलेले नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर अनेक दावे व्हायरल होत आहेत. यातच आता काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा एक फोटो शेयर करून एक दावा केला जात आहे. शिवकुमार यांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन घेतले असा हा दावा आहे. असा दावा करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकरवादी विचारवंत शरद पोंक्षे यांचाही समावेश आहे.

Fact Check: कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमारांनी घेतले टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन? खोटा आहे हा दावा
Courtesy: Twitter@ponkshes

“हे आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार शपथ ग्रहणाच्या अगोदर जाऊन टिपू सुलतान च्या थडग्यावर दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन आले आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले…. कोंग्रेस पार्टी उघडपणे इतकं सगळं करत असताना देखील जेव्हा हिंदू लोक यांना मत देतात हयाच्याएवढं दूर्दैव काय?” असे हा दावा म्हणतो.

या ट्विट चे संग्रहण येथे पाहता येईल.

अशाच पद्धतीचा दावा इतर भाषांमधूनही करण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

हा दावा व्हाट्सअप वर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

आमच्या व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून तथ्य तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमारांनी घेतले टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन? खोटा आहे हा दावा

Fact Check/ Verification

न्यूजचेकरने व्हायरल इमेज गुगल वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले असता, आम्हाला Ar Zakir 4 Mla या फेसबुक पेजवर ८ नोव्हेंबर २०१९ रोजी करण्यात आलेली एक पोस्ट आढळली. यामध्ये सध्या व्हायरल होत असलेला डी. के. शिवकुमार यांचा फोटो पाहायला मिळाला. तसेच #tippusultan #peace #harmony #dkshivkumar #loveforall #arzforshivajinagar असे हॅशटॅग्स वापरण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

Fact Check: कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमारांनी घेतले टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन? खोटा आहे हा दावा
Courtesy: Facebook/ Ar Zakir 4 Mla

या पोस्टवरून आम्हाला व्हायरल फोटो २०१९ पासूनच इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. आम्हाला नोव्हेंबर 2019 मध्ये ‘टिपू सुलतान’ नावाच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेली पोस्ट सापडली. व्हायरल पिक्चर व्यतिरिक्त इतरही अनेक फोटो यामध्ये आहेत. चित्राच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “कर्नाटकचे राजकीय समस्यानिवारक डीके शिवकुमार यांनी श्रीरंगपटना येथे ‘टायगर ऑफ म्हैसूर’ टिपू सुलतानचा सत्कार केला.”

कर्नाटक विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवकुमार यांनी २० मे २०२३ रोजी शपथ घेतली. दरम्यान त्यादिवशी किंवा तत्पूर्वी एक दोन दिवस आधी शिवकुमार यांनी टिपू सुलतान यांच्या समाधीचे दर्शन घेतले का? यादृष्टीने आम्ही शोध घेतला. मात्र तसे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स आम्हाला उपलब्ध झाले नाहीत. दैनिक सकाळ ने २० मी रोजीच शपथविधी घेतल्याची बातमी अपलोड केली आहे. ती पाहता येऊ शकते.

Fact Check: कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमारांनी घेतले टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन? खोटा आहे हा दावा
Screengrab of esakal

८ नोव्हेंबर २०१९ रोजी इंटरनेट वर उपलब्ध समान फोटो वरून सुगावा घेऊन आम्ही त्यादृष्टीने किवर्ड सर्च घेतला. आम्हाला शिवकुमार यांच्या त्याच तारखेला टिपू सुलतान यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडले.

Fact Check: कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमारांनी घेतले टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन? खोटा आहे हा दावा
Google Search Result

तपासादरम्यान आम्हाला ‘विजयकर्नाटक’च्या वेबसाइटवर तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. टिपू सुलतान जयंती रद्द केल्यावर आणि कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारने टीपूचा इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यानंतर डीके शिवकुमार यांनी टिपूच्या समाधीला पुष्पहार अर्पण केला. यादरम्यान ते मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथे टिपूच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी पगडी घालून आणि हातात तलवार घेऊन आले होते. रिपोर्ट्सनुसार, डीके शिवकुमार यांनी या काळात मंड्यातील अनेक मंदिरांना भेटी देऊन प्रार्थना केल्या.

आम्हाला AsianetSuvarnaNews च्या युट्युब चॅनेलवर ८ नोव्हेंबर २०१९ रोजी अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

या व्हिडिओमध्ये डी. के. शिवकुमार हैदरअली प्रमाणे पेहराव करून समाधीला वंदन करताना दाखविण्यात आले आहेत. त्यावेळच्या व्हिज्युअल्स मध्ये व्हायरल छायाचित्राप्रमाणेच त्यांनी पेहराव केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हैदरअलीच्या समाधीकडे जाण्यापूर्वी त्यांनी टिपू सुलतान चे दर्शन घेतल्याचे म्हटले आहे. TV9 कन्नड वाहिनीनेही आपल्या युट्युब चॅनेलवर असेच वृत्त ८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध व्हिडीओ रिपोर्टच्या माध्यमातून दिले आहे.

व्हायरल छायाचित्रात शिवकुमार यांचा म्हैसुरी फेटा परिधान केलेला पेहराव आणि व्हिज्युअल्स मध्ये विशिष्ट पेहराव घालण्यापूर्वीचा पेहराव यामध्ये साम्य असल्याचेही आमच्या तपासात दिसून आले.

Conclusion

अशाप्रकारे २०१९ मध्ये दिलेल्या भेटीचा फोटो चुकीच्या संदर्भाने शेयर करण्यात आला असून डी. के. शिवकुमार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन घेतल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा दावा केला गेला असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Facebook post by Ar Zakir 4 Mla on November 8, 2019
News published by Sakal on May 20, 2023
News published by Vijay Karnataka on November 8, 2019
Video published by Asianet Suvarnanews on November 8, 2019
Video published by TV9 Kannada on November 8, 2019


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,789

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.