व्हायरल फोटो केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकरी घराकडे परततानाचा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर 2021 रोजी ‘गुरु नानक जयंती’ निमित्त राष्ट्राला संबोधित करताना, 2020 मध्ये संसदेने मंजूर केलेले तीन नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. 2 डिसेंबर 2021 रोजी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची संमती मिळाल्यानंतर, तिन्ही कृषी कायदे अधिकृतपणे मागे घेण्यात आले.
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याने व इतर मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा करत लवकरच आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या पर्वात शेतकऱ्यांनी आपले सामान घेऊन घरी जाण्याची तयारी सुरू केली असून काही शेतकरी आधीच घराकडे रवाना झाले आहेत.
या क्रमाने, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर हे चित्र घरी परतणाऱ्या लहान शेतकऱ्याचे असल्याचा दावा करत एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.
Fact Check/Verification
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर घरी परतणारा हा लहानगा शेतकरी म्हणून शेअर केलेल्या या फोटोची पडताळणी करण्यासाठी आम्ही Google वर शोध घेतला. या प्रक्रियेत, आम्हाला आढळले की, एक वर्षापासून हे व्हायरल चित्र इंटरनेटवर आहे.

वरील गुगल सर्चमधून मिळालेल्या परिणामांमध्ये, आम्हाला 8 डिसेंबर 2020 रोजी सबरंगने प्रकाशित केलेल्या लेखात व्हायरल इमेज आढळली. व्हायरल फोटो aramonline.in नावाच्या वेबसाइटद्वारे 2 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित झालेल्या लेखात देखील आहे.

इतर काही कीवर्ड आणि Twitter Advanced Search चा वापर करून, आम्हाला नोव्हेंबर 2020 मध्ये व्हायरल झालेला फोटो शेअर केलेल्या अनेक ट्वीट आणि फेसबुक पोस्ट देखील आढळल्या.
काही पंजाबी कीवर्ड वापरून फेसबुक वर शोध घेतला असता, आम्हाला ऑक्टोबर 2020 मध्ये व्हायरल प्रतिमेसह शेअर केलेल्या काही इतर पोस्ट आढळल्या, जे केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतरचा हा फोटो नसल्याची पुष्टी करतात.


Conclusion
अशाप्रकारे, आमच्या पडताळणीत हे स्पष्ट होते की, केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एक लहान शेतकरी घरी परतत असल्याचा फोटो 2020 पासून इंटरनेटवर आहे. तथापि, व्हायरल फोटोच्या मूळ स्त्रोताबाबत आमचा तपास अद्याप सुरू आहे आणि आम्हाला या विषयावर कोणतीही विश्वासार्ह माहिती मिळाल्यास आम्ही आमच्या लेखात समाविष्ट करू.
Result: Misplaced Context
Our Sources
Sabrang India: https://sabrangindia.in/article/snapshots-revolution-top-10-photos-bharat-bandh
Facebook post by Balbir Singh Bains: https://www.facebook.com/balbir.s.bains/posts/10224411375338161
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.