ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटविला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की,“सरकारने 10वी आणि 12वीच्या फॉर्ममधून ‘हिंदू’ हा पर्याय काढून टाकला आहे. राज्य सरकारने पुढील बोर्ड परीक्षांसाठी जाहीर केलेल्या नवीन फॉर्ममध्ये हिंदूऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द लिहिला आहे.

Factcheck/Verification
ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटविलेला आहे का याची पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी काही किवर्ड्सच्या आधारे शोध सुरु केला असता आम्हाला Times of India ची 3 सप्टेंबर 2013 रोजीची एक बातमी आढळून आली.
या बातमीत म्हटले आहे की, पुढील शैक्षणिक वर्षापासून एसएससी आणि बारावीच्या परीक्षांच्या अर्जावर स्वतंत्र कॉलम असेल ज्यामध्ये उमेदवार अल्पसंख्याक समुदायाचे असल्यास ते नमूद करू शकतील. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आरिफ नसीम खान आणि शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यात सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
“विद्यार्थ्यांना सध्याच्या अर्ज प्रणालीमध्ये त्यांची जात (SC/ST/OBC) निर्दिष्ट करण्याचा पर्याय आहे. परंतु अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांसाठी अशी कोणतीही तरतूद नाही.या नवीन प्रणालीमुळे अल्पसंख्याक समाजातील किती विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसले आहेत याची अचूक माहिती एकत्रित करण्यात मदत होणार नाही, तर त्यामध्येही मदत होईल.

अधिक शोध घेतला असता आम्हाला mahahsscboard.in वेबसाईटवर आम्हाला 2017 मध्ये अपलोड करण्यात आलेला व्हायरल फाॅर्म आढळून आला यात देखील Non minority आणि Minority असे पर्याय असल्याचे आढळून आले आहे.

यावरुन हेच स्पष्ट होते की 2014 ते 2017 पर्यंत फाॅर्ममध्ये हिंदू पर्याय नव्हता मात्र त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे नव्हे तर भारतीय जनता पार्टीचे सरकार होते. म्हणजेच व्हायरल दावा चुकीचा असल्याचे आढळून आले. मात्र हिंदू शब्द कधी हटविला आहे किंवा समाविष्टच केला नाही का? याचा शोध आम्ही पुढे सुरुच ठेवला.
या शोधादरम्यान आम्हाला लोकमतची 3 डिसेंबर 2020 रोजीची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, दहावी बारावी च्या परीक्षा अर्झात 2014 पासूनच मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, पारसी, जैन यासाठी मायनाऑॅरिटी आणि इतर घटकांसाठी नाॅन मायनाॅरिटी असे रकाने असे रकाने समाविष्ट करण्यात आले आहेत, असे स्पष्टिकरण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे.
परीक्षा अर्जामध्ये हिंदू शब्द वगळल्याच्या पार्श्वभुमीवर मंडळाने हे स्पष्टिकरण दिल्याचे बातमीत म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी आम्ही मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “दहावी बारावीच्या परीक्षा फाॅर्ममध्ये मायनाॅरिटी व नाऑॅन मायनाॅरिटी या रकानाच्या समावेश 2014 मध्येच करण्यात आलेला आहे. समाजमाध्यमांत चुकीच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. कृपया यावर विश्वास ठेवू नये”.
Conclusion
यावरुन स्पष्ट होते की,ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटविलेला नाही. दहावी बारावीच्या परीक्षा फाॅर्ममध्ये मायनाॅरिटी व नाऑॅन मायनाॅरिटी या रकानाच्या समावेश 2014 मध्येच करण्यात आलेला आहे. समाजमाध्यमांत चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
Result: Misleading
Our Sources
Direct contact
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.