Sunday, March 16, 2025
मराठी

Fact Check

शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी आर्मीने जवानांची तुकडी पाठवलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

Written By Yash Kshirsagar
Dec 13, 2020
banner_image

शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी आर्मीने जवानांची तुकडी पाठवली असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात आर्मीच्या गाड्यांचा ताफा जाताा दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ एका व्यक्तीने कारमधून चित्रित केला आहे आणि त्या जागेचे वर्णन गाझियाबाद टोल प्लाझा असे सांगत आहे. गाडी थांबताच तो म्हणतो की, “सैन्य दिल्लीला बोलविण्यात आले आहे. हे गाझियाबाद टोल प्लाझाचे दृश्य आहे. शेतकरी आंदोलनामुळे सैन्य दिल्लीला बोलावले आहे. वाहनांची लाईन दीड किलोमीटर लांब आहे.”

संग्रहित

अधिक शोध घेतला असता आम्हाला आणखी एका ट्विटर हॅंडलवर हा व्हिडिओ आढळून आला. मात्र यात याचा आवाज म्यूट करण्यात आलेला आहे.

https://twitter.com/sgsssouthall/status/1333333558946127872

आणखी एक व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल आहे ज्यामध्ये एक व्यक्ती सैन्याच्या ट्रकच्या ताफ्याचा व्हिडिओ घेत आहे आणि तो असेही म्हणतात की, “भारतीय सैन्याला शेतकरी आंदोलन संपवण्यासाठी बोलावले आहे. येथे सैन्याच्या ट्रकची रांग बघू शकता. आंदोलन आहे. मोदी सरकार शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी धोरण आखत आहे. मी स्वत: हे नोंदवत आहे. शेतक-यांचा आवाज सर्वत्र पोहोचला पाहिजे.”

https://www.facebook.com/lovedeen.khan.71/videos/247406150221891/

Fact Check/Verification

व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलन रोखण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आल्याचा बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांत आढळून आल्या नाहीत. अधिक शोध घेतला असता आम्हाला पीआयबीचे ट्विट आढळून आले ज्यात व्हायरल दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. ही रुटीन मुव्हमेंट असल्याचे म्हटले आहे. त्याचा शेतकरी आंदोलनाशी संबध नसल्याचे सांगितले आहे.

याशिवाय आम्हाला बुमलाईव या वेबपोर्टलचे एक आर्टिकल आढळून आले कर्नल आनंद यांनी हे दावे फेटाळून लावल्याचे म्हटले आहे, त्यांनी “सैन्य अनेक प्रशिक्षण शिबिरांसारख्या अनेक कारणांसाठी स्थलांतरण करते त्याचाच एक भाग आहे , चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका ” असे कर्नल आनंद यांनी सांगितले आहे मात्र सैन्याच्या हालचालीचे कारण स्पष्ट केले नाही अशीही माहिती आर्टिकलमध्ये दिली आहे.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, आर्मीच्या ताफ्याचा व्हिडिओचा शेतकरी आंदोलनाशी कुठहाली संबंध नाही, चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result- Misleading

Sources

पीआबी- https://twitter.com/PIBFactCheck/status/1337342353103851522

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,450

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.