सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये लष्करी विमानात लोकांचा जमाव बसलेला दिसत आहे. दावा केला जात आहे की हा फोटो भारतीय हवाई दलाच्या विमान सी -17 चा आहे. ज्यामध्ये 800 भारतीयांना अफगाणिस्तानातून एअर लिफ्ट करुन आपल्या देशात आणण्यात आले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, अफगाणिस्थानात राहणाऱ्या ८०० हिंदुस्थानी नागरिकांना भारत सरकारने एअर लिफ्ट केलंय. नमो नमो हे भारतीय वायुदलाचे IAF C 17 विमान.आज पहाटे तब्बल 800 भारतीयांना एअरलिफ्ट करून मायदेशी आणल आहे. संकट देशात असो की परदेशात देशातील मोदी सरकार आणि हिंदूस्थानी सैन्य दोन्ही समर्थ आहेत. नाहीतर, पाकिस्तानाततील कैदी मनमोहनसिंग ला सोडून आणता आलं नाही, शेवटी पाकिस्तान ने तुरुंगात मारून टाकलं.मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे!!

Fact Check / Verification
व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला. यात ाम्हाला आम्हाला Pacific Air Force च्या वेबसाइटवरील बातमीत हा फोटो सापडला.
वेबसाइटनुसार, हे फोटो 17 नोव्हेंबर 2013 रोजी फिलीपिन्सवर आलेल्या टायफून चक्रीवादळानंतर मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्याचे आहेत. या दरम्यान, 670 हून अधिक टॅक्लोबॅन रहिवाशांना अमेरिकेच्या हवाई दलाच्या सी -17 विमानाने मनिलाला नेण्यात आले होते.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे C-17 विमान भारतात आले. 17 ऑगस्ट रोजी हे विमान गुजरातच्या जामनगरमध्ये उतरले. पण, हा दावा खोटा आहे की विमानाने एका वेळी 800 लोकांना विमानात नेऊन विक्रम केला.
ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काबुलहून आलेल्या विमानात 120 भारतीय होते.

Conclusion
यावरुन हे स्पष्ट 800 भारतीयांना अफगाणिस्तानातून एअर लिफ्ट केल्याचा दावा चुकीचा आहे. तसेच व्हायरल होणारा फोटो 8 वर्ष जुना आहे. त्याचा अफगाणिस्तानशी काहीही संबंध नाही.
Result- Misleading
Our Sources
ANI
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा