Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक कोलाज व्हायरल होत आहे. यामध्ये दोन फोटो आहेत. एका चित्रात एक हिरव्या रंगाचा किडा आहे तर दुसऱ्या चित्रात एक मृतदेह दिसतोय . हे कोलाज शेयर करून काही युजर्स या किड्या पासून सावध रहा असे सांगत आहेत. या किड्याने चावा घेतला तर तात्काळ मृत्यू होतो असा दावा केला जात आहे.
फेसबुक वर युजर्सनी व्हायरल कोलाज शेयर करीत लिहिले आहे की,” जर आपल्या गावाच्या किंवा आसपासच्या ग्रुप मध्ये किंवा बुंदी टोक वा भिलवाडा चा ग्रुप असल्यास त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा .शेतांमध्ये एक असा किडा आला आहे कि ज्याने डंख मारल्यास तात्काळ मृत्यू येऊ शकतो.”

याचबरोबरीने ट्विटर वर सुद्धा काही युजर्स नी छायाचित्रे शेयर करून याचप्रकारचा दावा केला आहे.
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही कोलाजमधील छायाचित्रांची तपासणी केली. आम्हाला डीडी न्यूजच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट मिळाले आहे. या ट्विटमध्ये व्हायरल फोटो उपस्थित असून कृषी विज्ञान केंद्राचा हवाला देत हा दावा फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. हा किडा बहुतांशी उसाच्या शेतात आढळतो आणि त्याच्या दंशामुळे शरीरात खाज येते किंवा आग पडते, मृत्यू येत नाही, असेही लिहिले आहे. डीडी न्यूजचे हे ट्विट आंध्र प्रदेश सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेक ट्विटर हँडलने रिट्विटही केले आहे.

याशिवाय आम्हाला Owlcation नावाच्या वेबसाइटवर एक लेखही सापडला, ज्यामध्ये सुरवंटांच्या डंकातून किरकोळ लक्षणे दिसण्याबरोबरच धोकादायक अॅलर्जीबद्दल लिहिले आहे. पण त्याच्या दंशामुळे मृत्यू झाल्याचा उल्लेख नाही.
तपासादरम्यान आम्ही छायाचित्रातील मृतदेहाच्या उगमाचा शोध घेतला. आम्हाला १३ सप्टेंबर रोजी एका ट्विटर वापरकर्त्याने केलेले एक ट्विट सापडले. त्यात व्हायरल फोटोज आहेत. यानुसार महाराष्ट्रातील न्हावे ता. चाळीसगाव येथे वीज पडून पिता-पुत्र या दोघांचा मृत्यू झाला. वडिलांचे नाव शिवाजी चव्हाण आणि मुलाचे नाव विकी चव्हाण आहे. त्याच्या मदतीने आम्ही यूट्यूबवर सर्च केले. संघर्ष न्यूज मराठी आणि Aadhar News च्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ आम्हाला सापडला, व्हायरल फोटोतील दृश्य व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ती घटना चाळीसगाव येथे वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची असून महाराष्ट्रात घडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स कडूनही छापला गेलेला एक रिपोर्ट हाती आला. यात पिता-पुत्राचा मृत्यू वीज पडून झाल्याचेही म्हटले आहे. या रिपोर्ट नुसार शिवाजी चव्हाण (४५) हे मुलगा दीपक चव्हाण (१४) आणि पत्नीसह कापसाच्या शेतात गेले होते. दरम्यान, अचानक पाऊस सुरू झाला आणि हे तिघे जण एका झाडाखाली उभे राहिले. झाडावर वीज पडून शिवाजी चव्हाण आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर पत्नी बचावली. पोलिस प्रशासन वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. लोकांनी मृतदेह स्वतः खांद्यावर उचलून रुग्णवाहिकेपर्यंत नेले. रिपोर्टनुसार, स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
अशा पद्धतीने सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या घटनांचे फोटो शेअर करून किडा चावल्याने मृत्यू झाल्याचा दिशाभूल करणारा दावा शेअर केला जात असल्याचं आमच्या तपासात स्पष्ट झालं आहे.
Tweet by DD News on September 16, 2022
Article Published by Owlcation
Tweet by @Ganesh51230717 on September 14, 2022
Video Uploaded by Youtube Channel संघर्ष मराठी न्यूज on September 14, 2022
Video Uploaded by Youtube Channel Aadhar News on September 14, 2022
Report Published by Maharashtra Times on September 09, 2022
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.