महाराष्ट्रातील शेतक-यांना पेन्शन मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल झाला असून यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आता 55 वर्ष पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत. सोबत जी.आर. देत आहे. आपण आपल्या ओळखीच्या शेतकऱ्यांना माहीती द्याल ही अपेक्षा व विनंती.

Fact Check/Verification
महाराष्ट्र सरकारने खरंच शेतक-यांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र आम्हाला या सदंर्भात बातमी आढळून आली नाही. मात्र या मेसेज सोबत व्हायरल झालेले राजपत्र आम्ही बारकाईने वाचले असता सदर विधेयक तीन वर्षे जुने असल्याचे आढळून आले. ते विधान परिषदेत दिनांक 31 मार्च 2017 रोजी सादर करण्यात आले होते.

या विधेयक जर तीन वर्षांपूर्वी पारित झाले असेल तर आता शेतक-यांना आणि शेतमजूर भूमीहिनांना पेंशन मिळत आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाली एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली बातमी आढळून आली. या बातमीनुसार, महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारवर शेतकरी कर्जमाफीसाठी दबाव वाढत आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रातील बहुतेक व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकरी पेन्शन योजनेबाबतचे मेसेज फिरत आहेत. इतकंच नाही तर राज्य सरकारच्या गॅझेटचा दाखला देत शेतकऱ्यांना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याची विधेयकाची कॉपी फॉरवर्ड होत आहे. काँग्रेस आमदार रामहरी रुपनवार यांच्याकडून हे खासगी विधेयक मांडण्यात आलं होतं. मात्र जोपर्यंत हे विधेयक सरकार स्वीकारत नाही, तोपर्यंत त्याला कायद्याचा दर्जा मिळत नाही. असं बातमीत म्हटले आहे. याचा अर्थ असा होतो की तत्कालीन सरकारच्या काळात देखील याला कायद्याचा दर्जा मिळाला नाही. शिवाय नवीन सरकारने देखील शेतक-यांना 3000 रुपये पेंशन देण्याची घोषणा केलेली नाही.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, महाराष्ट्रातील 55 वर्षांवरील शेतक-यांना 3000 रुपये पेन्शन मिळणार असल्याचा दावा खोटा आहे. तीन वर्षांपूर्वी देखील हा दावा व्हायरल झाला आहे. कांग्रेस आमदाराने विधानपरिषदेत खासगी विधेयक मांडले होते त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.
Result-Misleading
Our Sources
ABP MAJHA- https://marathi.abplive.com/news/viral-such-will-farmer-get-rs-3000-as-pension-392074
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.