दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी निघालेल्या महिलांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात स्वत: महिला ट्रॅक्टर चालवत निघालेल्या दिसत आहेत. दावा करण्यात येत आहे की या हरियाणातील महिला शेतकरी असून त्यांची एक तुकडी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाली आहे.
Fact check / Verification
केंद्र सरकारने केेलेल्या नव्या कृषी कायद्यास गेल्या अनेक दिवसांपासून विरोध होत आहे. पंजाब, हरियाणासह देशातील अनेक राज्यांतील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी निषेध मोर्चा काढला आहे. नवीन कृषी कायदा मागे घ्यावा आणि पिकांना किमान आधारभूत किंमतीची हमी मिळावी यासाठी देशातील शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. अशातच महिला ट्रॅक्टर चालवित निघाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. आम्ही हा फोटो नेमका कुठला आहे याचा तपास करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून सर्च केला असता आम्हाला फेब्रुवारी 2017 मध्ये हिंदुस्तान टाईम्सच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातमीत हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, जाट आरक्षणासाठी रोहतकमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या जाट महिला निघालेल्या आहेत.

अधिक शोध घेतला असता हा फोटो Outlook या वेबसाईटवर आढळून आला यात देखील म्हटले आहे की, आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या महिला ट्रॅक्टरवर स्वार होऊन निघालेल्या आहेत.

त्यानंतर आम्ही जाट आरक्षण चळवळ नेमकी काय आहे याची माहिती मिळवण्यासाठी गुगलवर शोध घेतला. या शोधादरम्यान दैनिक भास्करच्या वेबसाईटवर प्रकाशित एका लेखात माहिती मिळाली की, हरियाणाच्या 30 टक्के लोकसंख्या असलेल्या जाट समुदायाला ओबीसी (इतर मागासवर्गीय) आरक्षण हवे आहे. 2012 साली हरियाणा कॉंग्रेसच्या तत्कालीन भूपेंद्रसिंग हुड्डा सरकारने जाट, शीख, रोड, बिश्नोई आणि त्यागी समाजाला विशेष मागास प्रवर्गात आरक्षण दिले. पण सर्वोच्च न्यायालयाने जाटांना मागास मानण्यास नकार देऊन सरकारचा आदेश रद्द केला होता.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, ट्रॅक्टर चालवित आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या महिलांचा फोटो हा आत्ता दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यानचा नाही तर तीन वर्षांपूवी हरियाणात जाट आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जाट महिलांचा आहे.
Result -Misleading
Our sources
हिंदुस्तान टाईम्स- https://www.hindustantimes.com/india-news/jat-stir-gaining-momentum-crowds-swelling/story-YugKQjOx3aWtAvO8aNJyiK.html
दैनिक भास्कर- https://www.bhaskar.com/HAR-ROH-OMC-fact-about-jaat-reservation-5254530-PHO.html/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.