पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 वर्षीय ड्रोन वैज्ञानिक प्रताप. एन. एम ची DRDO मध्ये वैज्ञानिक पदावर नियुक्ती केली आहे.
सोशल मीडियात ड्रोन वैज्ञानिक प्रताप एन. एम याच्याविषयी पोस्ट व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष अधिकारातून 21 वर्षीय प्रतापची DRDO मध्ये वैज्ञानिक पदावर नियुक्ती केली आहे. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, प्रतापला फ्रांसच्या एका डिफेन्स कंपनीची आॅफर होती पण पंतप्रधांनी त्याला इथे संधी दिली. टॅलेंटची कदर करणारा देशातील पहिलेच पंतप्रधान असावेत असा दावा देखील केला आहे. याशिवाय पोस्टमध्ये प्रतापच्या जीवन संघर्षाची माहिती देखील दिली गेली आहे.

पडताळणी
आम्ही याबाबतीत पडताळणी सुरु केली. प्रताप एम. एन या युवा वैज्ञानिकाची खरंच डिआरडिओमध्ये नियुक्ती केली गेली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता फेसबुकवर याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.

गूगलमध्ये शोध घेतला असता प्रताप विषयी मागील वर्षीच्या अनेक बातम्या आढळून आल्या यात युअर स्टोरी या वेबसाईटवर प्रतापबद्दल माहिती देणारा लेख आढळून आला.

याशिवाय आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतापची निवड केल्याची एकही बातमी आढळून आली नाही. मात्र अधिक शोध घेतला असता बुम लाईव्ह या वेबसाईटवर एक आर्टिकल आढळून आले. ज्यात म्हटले आहे की प्रतापने वेबसाईटशी बोलताना सांगितले की, पंतप्रधानांकडून अशा प्रकारची नियुक्तीची आॅफर आलेली नाही. पोस्टमधील दावे योग्य आहेत मात्र डिआरडिओमध्ये वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याचा दावा चुकीचा आहे.
प्रताप एन. एम सध्या तरी डिआरडिओच्या भरतीस पात्र नाही कारण त्याच्याकडे मास्टर डिग्री नाही. आम्ही डिआरडिओमध्ये नियुक्तीसाठीच्या अटी काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता याबद्दल वेबसाईटवर माहिती मिळाली. यावरुन हे लक्षात येते की सध्यातरी प्रताप डिआरडिओ जाॅईन करु शकत नाही.

यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल पोस्टमध्ये युवा वैज्ञानिक प्रताप एन. एम च्या बाबतीत अनेक दावे खरे असले तरी पंतप्रधानांनी त्याची नियुक्ती डिआरडिओमध्ये केल्याचा दावा चुकीचा आहे.
Source
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)