Sunday, April 27, 2025
मराठी

Fact Check

आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. भीमराव आंबेडकर यांनी हे खरंच विधान केलंय? चुकीचा दावा व्हायरल 

Written By Sandesh Thorve
Jul 25, 2022
banner_image

(याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख सौरभ पांडे यांनी लिहिला आहे.)

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करण्याबाबत म्हटले होते. फेसबुकवर हा दावा शेअर केला जात आहे.

फोटो साभार : Facebook/पंकज ओम् सारस्वत

ट्विटरदेखील हा दावा शेअर केला जात आहे.

२१ जुलै रोजी राष्ट्रपती पदाच्या निकालानंतर एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या. देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांना एकूण ४७५४ मते पडली. त्यातील ५३ अवैध ठरली. उरलेल्या ४७०१ मतांमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना २८२४ मते मिळाली. त्यातच विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना १८७७ मते मिळाली. द्रौपदी मुर्मू या प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहे.

भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर आर्थिक आणि सामाजिक समानतेसाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. आताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती या आदिवासी समाजाच्या असल्याने त्यांच्या विजयानंतर याचा परिणाम त्यांचा समाजावर देखील होत असल्याची चर्चा होत आहे. एका बाजूला लोक याला केवळ प्रतिकात्मक सन्मान म्हणत आहे तर दुसऱ्या बाजूने लोक द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीला आदिवासी आणि वंचित घटकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हणत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर युजर दावा करत आहे की, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करण्याबाबत म्हटले होते. 

Fact Check / Verification

डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करण्याबाबत म्हटले होते, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर काही कीवर्ड टाकून शोधले. पण या प्रक्रियेत आम्हांला व्हायरल दाव्याची पुष्टी केली जाऊ शकेल, अशी एकही बातमी मिळाली नाही.

फोटो साभार : Google Search Result

त्यानंतर आम्ही डॉ. भीमराव आंबेडकर यांचे प्रसिद्ध पुस्तक Annihilation of caste या पुस्तकात प्रकाशित झालेले दस्तावेज आणि संविधान सभेतील सर्व कार्यवाही (, , , ) मध्ये देखील शोधले. पण या सर्व प्रक्रियेत आम्हांला व्हायरल दाव्याची पुष्टी केली जाऊ शकेल, अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.

व्हायरल दाव्यासंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही दलित विचारवंत आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर प्रदीर्घ काळ अभ्यास करणारे सुनील कदम यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी न्यूजचेकरशी बोलतांना सांगितले,”हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी असे काहीही सांगितलेले नाही. होय, ते असं नक्कीच म्हणाले होते की, वंचित आणि शोषित घटकातील महिला जेव्हा उच्च पदावर पोहोचतील तेव्हा समाजावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि त्यामुळे वंचित घटकांचे जीवनमान सुधारेल. पण आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यास आरक्षण रद्द करू, असे त्यांनी कधीच म्हटले नाही.”

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द करण्याबाबत म्हटल्याच्या नावाने शेअर केला जाणारा दावा चुकीचा आहे. परंतु त्यांनी असे कधीही सांगितले नव्हते किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यात या विधानाचा उल्लेख आढळलेला नाही. 

Result : False

Our Sources

फोनवरून दलित विचारवंत आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर प्रदीर्घ काळ अभ्यास करणारे सुनील कदम यांच्याशी झालेला संवाद

न्यूजचेकरचे विश्लेषण 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
No related articles found
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,944

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.