Thursday, April 24, 2025
मराठी

Fact Check

31 मार्च 2024 नंतर जुन्या सिरीजमधील ₹100 च्या नोटा बंद होतील का? जाणून घ्या या व्हायरल दाव्याचे सत्य

Written By Saurabh Pandey, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Dec 29, 2023
banner_image

Claim

31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जातील असा दावा सोशल मीडिया युजर्स करत आहेत.

31 मार्च 2024 नंतर जुन्या सिरीजमधील ₹100 च्या नोटा बंद होतील का? जाणून घ्या या व्हायरल दाव्याचे सत्य
Newschecker च्या टिपलाइनवर दाखल दावा

Fact

31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात येणार असल्याचे सांगून शेअर केल्या जाणाऱ्या या दाव्याची Newschecker ने इंग्रजी भाषेत तथ्य तपासणी केली आहे. आमच्या तपासादरम्यान, आम्हाला व्हायरल दाव्याला पुष्टी देणारा कोणताही मीडिया रिपोर्ट सापडला नाही. तथापि, आम्हाला जानेवारी 2021 मध्ये प्रकाशित असे अनेक मीडिया रिपोर्ट्स (1, 2, 3) प्राप्त झाले, ज्यामध्ये RBI ने म्हंटले आहे की जुन्या 100 च्या नोटा बंद केल्या जाणार नाहीत आणि नवीन नोटांप्रमाणे चलनात राहतील. या संदर्भात RBI ने 25 जानेवारी 2021 रोजी शेअर केलेल्या ट्विटमध्ये देखील माहिती दिली होती की चलनात असलेल्या 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीत.

जुलै 2018 मध्ये ‘रानी की वाव’ सह छापलेल्या 100 रुपयांच्या नवीन नोटा जारी करताना, RBI ने एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले होते की, सर्व जुन्या 100 रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून चलनात राहतील.

याशिवाय, RBI वेबसाइटवर सध्या चलनात असलेल्या कायदेशीर टेंडर नोटांची यादी पाहिल्यानंतर, आम्हाला आढळले की 100 रुपयांच्या जुन्या नोटा अजूनही कायदेशीर निविदा म्हणून चलनात आहेत.

31 मार्च 2024 नंतर जुन्या सिरीजमधील ₹100 च्या नोटा बंद होतील का? जाणून घ्या या व्हायरल दाव्याचे सत्य
RBI च्या वेबसाइटवर उपलब्ध माहिती

आरबीआयच्या वेबसाइटच्या नोटिफिकेशन विभागातही आम्हाला जुन्या 100 रुपयांच्या नोटा बंद करण्यासंबंधी कोणतीही माहिती आढळली नाही.

अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की 31 मार्च 2024 नंतर 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या जाणार असल्याचे सांगून शेअर करण्यात आलेला हा दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक आरबीआयने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

Result: False

Our Sources

Report by Live Mint dated January 25, 2021
Report by NDTV profit dated January 25, 2021
Report by CNBC TV18 dated January 25, 2021
RBI notification on currency dated September 30, 2023
RBI list of banknotes in India
RBI press note announcing launch of new ₹100 notes


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,898

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.