Saturday, April 26, 2025

Fact Check

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीत संजय राऊत चहा बनवत होते?

Written By Yash Kshirsagar
Jun 14, 2021
banner_image

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत चहा बनवत असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खुर्च्यांवर बसलेले दिसत आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सोप्यावर बसलेले आहेत तर या सर्वांच्या मध्ये एक टी पाॅय असून त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत चहा बनवत असल्याचे दिसते.

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये देखील संजू कंपाउडर… चाय गरम… चाय गरम असे लिहिले आहे. आम्हाला संजय राऊत यांचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चहा बनवितानाचा फोटो असलेल्या अनेक पोस्ट फेसबुकवर आढळून आल्या.

संग्रहित

crowdtangle देखील आम्हाला या पोस्टसंदर्भात 1,808 इंट्रेक्शन्स झाली आहेत तर सर्वात जास्त लाईक्स Shandilya Gaurav Chaudhary यांच्या पोस्टला मिळाल्याचे आढळून आले.

Fact Check/Verification

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत खासदार संजय राऊत यांनी चहा बनविल्याच्या फोटोचे सत्य काय आहे? याची आम्ही पडताळणी करण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक नेमकी कधी आणि कशासाठी झाली होती याबाबत काही किवर्ड्सच्या साहाय्याने शोध सुरु केला असता आम्हाला टिव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर 8 जून 2021 रोजीची बातमी आढळून आली.

या बातमीत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, पीक विमा, चक्रीवादळाने झालेलं नुकसान यांसह महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मात्र या बातमीत खासदार संजय राऊत बैठकीत उपस्थित असल्याचा उल्लेख तसेच सोशल मीडियात व्हायरल होत असलेला फोटो देखील आढळून आला नाही. त्यामुळे आम्ही याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी शोध पुढे सुरु ठेवला असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची त्याच दिवशीची बातमी आढळून आली यात व्हायरल होत असलेल्या फोटोशी मिळता जुळता फोटो देखील आढळून आला. मात्र यात संजय राऊत दिसत नाहीत तसेच शिवाय टी पाॅयवर चहाचे कप देखील दिसत नाहीत.

बातमीत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरेंची 45 मिनिटांची बैठक पावणे दोन तासांनी आटोपली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसोबत होते. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोक कल्याण मार्ग स्थित निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळाचा फटका, लसीकरण अशा अनेक मुद्यांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात ही चर्चा होत आहे.

याशिवाय आम्हाला या बैठकीचे पंतप्रधान कार्यालयाचे ट्विट देखील आढळून आले, ज्यात व्हायरल फोटो शेअर करण्यात आला आहे. मात्र यात कुठेही संजय राऊत दिसत नाहीत.

शिवाय मुख्यमंत्री कार्यालयाने देखील या बैठकीचा फोटो ट्विट केला आहे मात्र यात देखील संजय राऊत दिसत नसल्याने हा फोटो एडिट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत खासदार संजय राऊत चहा बनवित नव्हते, एवढेच नाही तर ते बैठकीला देखील हजर नव्हते. सोशल मीडियावर एडिटेड फोटो व्हायरल झाला आहे.

Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही

Result: False

Claim Review:  पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीत संजय राऊत चहा बनवत होते
Claimed By: Viral Post
Fact Check: Manipulated Media

Our Sources

महाराष्ट्र टाईम्स- https://maharashtratimes.com/india-news/live-update-uddhav-thackeray-to-meet-pm-narendra-modi-in-delhi-maratha-reservation-vaccination/articleshow/83329431.cms

सीएमओ- https://twitter.com/CMOMaharashtra/status/1402157906552778752


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,944

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.