Saturday, April 26, 2025

Fact Check

‘स्वीडनला कलंकित करण्यासाठी खोटी माहिती’, स्वीडनने सेक्सला एक खेळ म्हणून घोषित केल्याच्या रिपोर्टवर देशातील मुख्य क्रीडा संस्थेचा खुलासा

Written By Kushel Madhusoodan, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Jun 6, 2023
banner_image

Claim
स्वीडनने सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिली आहे.

Fact
स्वीडिश स्पोर्ट्स फेडरेशनने सेक्सला खेळ म्हणून वर्गीकृत करण्याचा अर्ज नाकारला आहे.

टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाईम्स, न्यूज18, इंडिया टुडे यासह अनेक भारतीय प्रसारमाध्यमांनी अलीकडेच वृत्त प्रसिद्ध केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की स्वीडनने सेक्सला खेळ म्हणून घोषित केले आहे आणि या आठवड्यात पहिली-वहिली सेक्स स्पर्धा होणार आहे. “8 जून रोजी, स्वीडिश सेक्स फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली जाईल,” असे News18 चा रिपोर्ट सांगतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी सांगितले की, सेक्सला एक खेळ म्हणून मान्यता मिळणे अपरिहार्य आहे आणि त्यांनी लैंगिक उपक्रमांद्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची क्षमता आणि त्यासाठी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “इतर कोणत्याही खेळाप्रमाणेच, सेक्समध्ये इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे, लोकांसाठी या डोमेनमध्ये स्पर्धा सुरू करणे केवळ तर्कसंगत आहे” टाइम्स ऑफ इंडियाने उद्धृत केल्याप्रमाणे ब्रॅटिच म्हणाले.

असे दावे सोशल मीडियावर देखील पाहिले गेले, ज्याच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात.

Fact Check

न्यूजचेकरच्या लक्षात आले की इतकी मोठी स्पर्धा घेतली जाणार असल्यास त्यासाठी एखादी वेबसाईट असणे आवश्यक असते. मात्र स्पर्धेसाठी अद्याप कोणतीही अधिकृत वेबसाइट नाही. “टूर्नामेंट” ची तारीख लक्षात घेता 8 जून असल्याचे सांगितले गेले, मात्र प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि युरोपियन वृत्तपत्रांनी स्पर्धेबद्दल किंवा स्वीडनने सेक्सला एक खेळ असा दर्जा दिल्याबद्दल एकही वृत्त प्रसिद्ध केलेले नाही. यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाली.

संबंधित कीवर्ड शोधामुळे आम्हाला स्वीडिश न्यूज आउटलेट Goterborgs-Posten च्या 26 एप्रिल 2023 रोजीच्या लेखाकडे नेले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सेक्सला खेळ म्हणून वर्गीकृत करण्याचा अर्ज नाकारण्यात आला.

हे स्पष्टीकरण NDTV ने देखील दिले आहे. “स्वीडिश आउटलेटनुसार, स्वीडनमध्ये एक फेडरेशन ऑफ सेक्स आहे आणि त्याचे प्रमुख ड्रॅगन ब्रॅक्टिक यांनी चॅम्पियनशिप आयोजित करण्याची मागणी केली होती…तथापि, राष्ट्रीय क्रीडा महासंघाचा सदस्य होण्यासाठी फेडरेशनचा अर्ज नाकारण्यात आला. ब्रॅक्टिकने या वर्षी जानेवारीमध्ये अर्ज सादर केला होता,” असे हा रिपोर्ट सांगतो.

'स्वीडनला कलंकित करण्यासाठी खोटी माहिती', स्वीडनने सेक्सला एक खेळ म्हणून घोषित केल्याच्या रिपोर्टवर देशातील मुख्य क्रीडा संस्थेचा खुलासा

19 जानेवारी, 2023 रोजीच्या दुसर्‍या स्वीडिश मीडिया आउटलेट, TV4 द्वारे देखील प्रसिद्ध केलेला रिपोर्ट आम्हाला पाहायला मिळाला. ज्यात असे नमूद केले आहे की राष्ट्रीय क्रीडा महासंघाचे अध्यक्ष ब्योर्न एरिक्सन यांनी स्पष्ट केले की सेक्स हा खेळ म्हणून वर्गीकृत केला जाणार नाही. तसाच समान रिपोर्ट येथे पाहता येईल.

'स्वीडनला कलंकित करण्यासाठी खोटी माहिती', स्वीडनने सेक्सला एक खेळ म्हणून घोषित केल्याच्या रिपोर्टवर देशातील मुख्य क्रीडा संस्थेचा खुलासा
'स्वीडनला कलंकित करण्यासाठी खोटी माहिती', स्वीडनने सेक्सला एक खेळ म्हणून घोषित केल्याच्या रिपोर्टवर देशातील मुख्य क्रीडा संस्थेचा खुलासा

त्यानंतर आम्ही स्वीडिश स्पोर्ट्स फेडरेशनशी संपर्क साधला, ज्यांनी मीडिया रिपोर्ट खोटे असल्याचे सांगितले.

“स्वीडिश स्पोर्ट्स कॉन्फेडरेशनने या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले आहे की आंतरराष्ट्रीय मीडियाच्या काही विभागांनी सध्या सेक्स फेडरेशन हे स्वीडिश स्पोर्ट्स कॉन्फेडरेशनचे सदस्य बनल्याच्या बातम्या पसरवल्या आहेत. स्वीडिश क्रीडा आणि स्वीडन यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने ही खोटी माहिती आहे. स्वीडिश स्पोर्ट्स कॉन्फेडरेशनचे सदस्य असलेले कोणतेही सेक्स फेडरेशन नाही. ही सर्व माहिती खोटी आहे,” स्वीडिश स्पोर्ट्स कॉन्फेडरेशनच्या कम्युनिकेशन आणि प्रेस प्रमुख अण्णा सेटझमन यांनी ही माहिती दिली.

आम्ही संबंधित फेडरेशनशी संपर्क साधला, ज्यांनी सांगितले की, सेक्सची युरोपियन चॅम्पियनशिप आहे आणि ती स्वीडनमध्ये 8 जूनपासून सुरू होत आहे, परंतु त्याला खेळ म्हणून मान्यता मिळालेली नाही.

“सेक्स हा अजून एक खेळ म्हणून वर्गीकृत केलेला नाही आणि ते आर्थिक कारणांमुळे आहे. क्रीडा महासंघाला प्रशिक्षण सुविधा, पंच आणि पंच प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमांसाठी पैसे द्यावे लागतील. त्यांनी आम्हाला स्वीकारले नाही याचे हे एक कारण आहे. पण ते संपलेले नाही. यावर्षी त्यांनी ई-स्पोर्टला खेळ म्हणून स्वीकारले. कॉम्प्युटरसमोर बसून व्हिडिओ गेम खेळणे हे आयुष्य वाढवणाऱ्या निरोगी शारीरिक हालचालींपेक्षा जास्त खेळ आहे का? आम्ही तुम्हाला तुमचा स्वतःचा निष्कर्ष काढू देऊ. सेक्समधील युरोपियन चॅम्पियनशिप अस्तित्वात आहे आणि ती स्वीडनमध्ये 8 जूनपासून सुरू होत आहे. हा खेळ आहे की नाही… हे तितकेसे महत्त्वाचे नाही. युरो-व्हिजन ही देखील एक स्पर्धा आहे, परंतु तो एक खेळ नाही,” संघटनेने ईमेलमध्ये म्हटले आहे की, स्वीडिश सेक्स फेडरेशन ही जगातील एकमेव संस्था आहे ज्याला लैंगिक प्रशिक्षण आणि स्पर्धा आयोजित करण्याची सरकारी परवानगी आहे.

Conclusion

आमच्या तपासात स्वीडनने सेक्सला खेळ म्हणून घोषित केल्याच्या व्हायरल बातम्या खोट्या असल्याचे आढळून आले.

Result: False

Sources
Email from Swedish Sports Confederation
Goterbergs-Posten report, April 26, 2023
TV4 report, January 19, 2023


(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम कुशल एच एम यांनी केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,944

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.