व्हायरल फोटोतील मुलगी शेतकरी आंदोलनात लंगरदरम्यान जेवण वाढत असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियात एका फोटो शेअर होत असून यात एक लहान मुलगी हातात रोट्यांनी भरलेली प्लेट घेऊन उभी आहे तिच्या मागे पंगत बसलेली दिसत आहे. दावा करण्यात येत आह की, मुलगी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान सुरु असलेल्या लंगरमध्ये जेवण वाढत आहे. भक्तांना या लहान मुलीचा द्वेष करण्याचे कारण सापडले आहे

Fact Checking/Verification
व्हायरल फोटो शेतकरी आंदोलनात सुरु असलेल्या पंगती दरम्यानचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र मुख्य प्रवाहातील बातम्यांमध्ये किंवा सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील ताज्या लेखांमध्ये आम्हाला हा फोटो आढळून आला नाही. यानंतर आम्ही हा फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधण्यास सुरुवात केली असता 20 मार्च 2020 रोजीच्या एका ब्लाॅगमध्ये हा फोटो प्रतिकात्मक रित्या वापरलेला आढळून आला.

अधिक शोध घेतला असता फेब्रुवारी 2017 रोजीच्या एक फेसबुक पोस्टमध्ये सध्या व्हायरल होत असलेला फोटो आढळून आला. पोस्ट पंजाबी भाषेत असून आम्ही त्याचा अनुवाद केला असता गुरुची लंगर सेवा असे लिहिलेले आढळून आले.
याशिवाय आणखी एका पोस्टमध्ये व्हायरल फोटो आढळून आला.
मात्र हा फोटो तीन वर्षांपुर्वीचा असला तरी तो नेमका कुठला आहे याची आम्हाला माहिती मिळू शकली नाही.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटो तीन वर्षापुर्वीचा आहे त्याचा आत्ताच्या दिल्लीच्या सिंधू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंध नाही.
Result: Misleading
Our Sources
Facebook- https://www.facebook.com/aasitusi/photos/a.203716053013365/1462947567090201
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.