पालघर साधू हत्याकांडातील मुख्य हत्या-याचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पालघर साधु हत्यांकांडाचा मुख्य हत्यारा एनसीपी नेता संजय शिंदे याचा कार अपघातात जळून मृत्यू झाला. भगवान के घर देर है पर अंधेर नहीं.

Fact Check/Verification
आम्ही पालघर साधू हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कोण आहे व राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या शोधा दरम्यान आम्हाला न्यूज 18 लोकमतची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की चोर समजून दोन साधू आणि वाहन चालकाची जमावाने काठ्या, दांडक्याने बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी आतापर्यंत 101 लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र बातमीत कुठेही राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षाच्या नेत्याचा किंवा मुख्य सुत्रधाराचा उल्लेख नाही.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटक केलेल्या 101 आरोपींची यादी ट्विटरवर शेअर केली होती यात संजय शिंदे हे नाव आढळून आले नाही.
यानंतर आम्ही नुकतेच कार अपघातात मृत्यू पावलेले नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा पालघर साधू हत्याकांडाशी काय संबंध होता का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला न्यूज बाईट या इंग्रजी वेबसाईटवर बातमी आढळून आली. मात्र यात संजय शिंदे हे पालघर हत्याकांडी मुख्य सूत्रधार किंवा हत्यारे होते याचा उल्लेख नाही.

याशिवाय इंडिया टुडे या इंग्रजी वेबसाईटवर देखील ही बातमी प्रसिद्ध झाली आहे मात्र यात देखील संजय शिंदे हे पालघर साधू हत्याकांडामधील मुख्य आरोपी असल्याचा उल्लेख नाही.

यानंतर आम्हाला दैनिक सकाळच्या वेबसाईटवर 13 आॅक्टोबर 20202 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, मुंबई आग्रा महामार्गावर कारमध्ये शाॅर्टसर्किट झाले त्यात सॅनिटायझरने पेट घेतला यातच राष्ट्रवादीचे नेते संजय चंद्रभान शिंदे यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. बातमीत दिलेल्या माहितीनुसार संजय शिंदे हे राष्ट्रवादीचे निफाड तालुका उपाध्यक्ष होते शिवाय ते द्राक्ष निर्यातदार होते निफाड तालुक्याती साकोर मीग या गावचे रहिवाशी होते. त्यांच्या पत्नी गावच्या उपसरंपच आहेत. सकाळच्या बातमीत देखील त्यांचा पालघर हत्याकांडाशी संबंध असल्याचा उल्लेख नाही.

यानंतर आम्ही पिंपळगाव पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी एकनाथ पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला संजय शिंदे हे राष्ट्रवादीचे स्थानिक पातळीवरील नेते होते त्यामुळे त्यांचा आणि पालघरचा किंवा साधू हत्याकांडाचा कसलाच संबध नसल्याची व सोशल मीडियात खोटी माहिती व्हायरल झाल्याची माहिती दिली.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की , कार अपघातात मृत्यू पावलेले राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा पालघर साधू हत्याकांडाशी संबंध नाही. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे.
Result: False
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.