Monday, April 28, 2025
मराठी

Fact Check

Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे उद्धव ठाकरे बोलल्याचा जुना व्हिडीओ सध्याचा म्हणत व्हायरल

Written By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Apr 3, 2024
banner_image

Claim
शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपचे प्रचारक बनत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा, असे सांगत आहेत.

Fact
व्हायरल दावा चुकीच्या संदर्भाने केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती असताना हे विधान केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे उद्धव ठाकरे बोलल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. असा दावा व्हिडिओच्या माध्यमातून सध्या केला जात आहे.

दाव्याच्या कॅप्शनमध्ये “भाजपचे स्टार प्रचारक उद्धव ठाकरे” असा शीर्षस्थानी उल्लेख आहे. तसेच “अरेच्चा! मोदी सरकारला भाडोत्री सरकार म्हणणारे चक्क त्यांचा प्रचार करतायेत” असे म्हटल्याचे आम्हाला आढळले.

पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

Fact Check/ Verification

शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपचे प्रचारक बनत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे म्हणत असल्याचा दावा आम्हाला प्रथमदर्शनीच संशयास्पद वाटला. भाजपशी काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेने महाविकास आघाडीत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजपने शिवसेनेत फूट पाडण्याची राजकीय खेळी खेळून आपल्या समर्थनाचे सरकार स्थापन केले. यामुळे दुखावले गेलेले उद्धव ठाकरे सध्या भाजपवर प्रचंड मोठा प्रहार करीत आहेत. ही वस्तुस्थिती असताना सध्याच्या स्थितीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे म्हणणे हा मोठा विरोधाभास असल्याचे आम्हाला जाणवले. उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या दिल्ली येथील सभेत भाजपवर केलेल्या प्रहारांचे पुरावे आपल्याला ABP Majha ने ३१ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ रिपोर्टमध्ये पाहता येतील.

दरम्यान तपासासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला व्हायरल व्हिडिओ ९ वर्षांपूर्वीचा असून मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवरील महायुतीचं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचा असल्याचे दिसून आले. त्यावेळी उद्धव ठाकरे अर्थात पूर्वीची शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये होती. भाजपने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर २१ एप्रिल २०१४ रोजी या सभेचे थेट प्रक्षेपण केले होते.

या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे ३४.३३ सेकंदांवर बोलताना आढळतात. आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केल्याचे दिसून येते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये याच भाषणातील भाग वापरण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले.

संबंधित सभेतील आपल्या भाषणाचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंनीदेखील आपल्या @ShivSenaUBTOfficial या अधिकृत युट्यूब चॅनलवर २४ एप्रिल २०१४ रोजी शेअर केला होता. या व्हिडिओ मध्ये आपण देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे आणि नरेंद्र मोदी आदी नेत्यांनाही व्यासपीठावर पाहू शकतो.

शिवसेना आणि भाजपची युती असताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या जुन्या भाषणाचा आधार घेऊन संबंधित व्हिडीओ सध्याचा असल्याचे सांगत व्हायरल केला जात असल्याचे आम्हाला दिसून आले.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपचे प्रचारक बनत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा, असे सांगत आहेत, असे सांगणारा व्हायरल दावा चुकीच्या संदर्भाने दिशाभूल करीत केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपाची युती असताना हे विधान केले होते. हे स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Video published by ABP Majha on March 31, 2024
Video published by BJP on April 21, 2014
Video published by @ShivSenaUBTOfficial on April 24, 2014


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,946

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.