दावा–
शिवलिंगातून पाणी बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ त्र्यंबकेश्वर येथील आहे.
सोशल मीडियात त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगातून पाणी बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिवलिंगातून पाणी बाहेर पडणे म्हणजे जगावर खूप मोठे संकट येणार असल्याचा दावा देखील केला जात आहे.
पडताळणी–
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुुरु केली. फेसबुकवर हाच दावा करणा-या अनेक पोस्ट आढळून आल्या.

त्र्यंबकेश्वरमध्ये शिवलिंगातून पाणी बाहेर पडत असल्याच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांत आढळून न आल्याने आम्ही व्हायरल व्हिडिओमधून काही स्क्रीनशाॅट्स काढले आणि रिव्हर्स इमेजच्या मदतीने याबाबत शोध घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला NBI TV या कन्नड यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आढळून आला. यात व्हिडिओ सुरु झाल्यानंतर 1 मिनट 57 व्या सेंकदाला व्हायरल व्हिडिओ क्लिप दिसू लागते. यात हे SRI KAMANDALA GANAPATHI TEMPLE असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
आम्ही हे मंदिर नेमके कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता metrosaga.com या वेबसाईटवर हे एक हजार वर्षे जुने मंदिर कर्नाटकमधील चिकमंगलुर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.

आम्ही समाज माध्यमांत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील मंदिरातील गाभारा आणि मूर्तीची तुलना केली असता यात साम्य आढळून आले. दोन्हीत गणेशमुर्तीची सोंड, गाभा-याचे खांब तसेच खांबावरील देवतांची चित्रे सारखीच आहेत.


त्र्यंबकेश्वराची मूर्ती नेमकी कशी दिसते याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला दैनिक पुढारीच्या बातमीत मुर्तीचा फोटो आढळून आला.

यावरुन हेच सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ त्र्यंबकेश्वर मंदिरातील नसून कर्नाटकातील कमंडला गणपती मंदिरातील आहे. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Source
Facebook, Google Reverse Image,
Result– Fabricated News
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)