गुगल पे, फोन पे सारख्या UPI व्यवहारांवर 1 जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यात म्हटले आहे की, आजपर्यंत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण UPI पेमेंटवर 1 जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. जर कोणी थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे. महाराष्ट्र देशा आणि लोकमतच्या वेबसाईटवर आम्हाला ही बातमी आढळून आली.

दैनिक लोकमतने देखील ही बातमी प्रसिद्ध केल्याचे आढळून आले. यात देखील नवीन वर्षापासून युपीआय ट्रांजेक्शनसाठी शुल्क द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या नियमातून ‘पेटीएम’ला वगळण्यात आले असल्याचेही सांगितले आहे.

अधिक शोध घेतला असता झी न्यूजच्या वेबसाईटवर देखील ही बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआई) घेतला आहे. NPCI ने याचबरोबर थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे.

Fact Check/Verification
आतापर्यंत मोफत असणा-या गुगल पे , फोन पे सारख्या युपीआय व्यवहारांवर खंरच शुल्क आकारलं जाणार आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या शोध दरम्यान आम्हाला NPCI म्हणजेच ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ च्या अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्विट आढळून आले. यात 1 जानेवारीपासून युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या फेक असल्याचे स्पष्ट केले आहे. 5 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये अशा कुठल्याही शुल्क आकारणी बद्दल काहीही सांगण्यात आले नाही असं स्पष्ट करताना त्या ट्विट सोबत प्रेस रिलीजची लिंक देखील दिली आहे.
प्रेस रिलीज व्यवस्थित वाचल्यानंतर बातम्यांमध्ये उल्लेख केलेली कुठलीही बाब आढळली नाही. शिवाय प्रेस रिलीजमध्ये कुठल्याही थर्ड पार्टी अॅपचे नाव सुद्धा उल्लेखलेले नाही.

याशिवाय पीआयबी ने देखील ट्विट करुन व्हायरल बातम्या खोट्या असल्याची माहिती दिली आहे.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत, नवीन वर्षापासून युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाही.
Result- False
Sources
पीआबी- https://twitter.com/PIBFactCheck/status/1336538008149868546
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.