पेट्रोल पंपावर आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, व्हिडिओ महाराष्ट्रातील किनगाव येथील आहे. या व्हिडिओत एक मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरत असताना मोटारसायकलस्वार आपल्या हाताना सॅनिटायझर लावत असताना अचानक आग लागत असल्याचे दिसते.

Fact Check / Verification
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता आम्हाला फेसबुक वर याच दाव्याची एक पोस्ट आढळून आली. यात म्हटले आहे की, सॅनिटायझर लावून नये आणि चावीला देखील लावू नये.

हा व्हिडिओ वेगवेगळ्या शहरांच्या नावाने व्हायरल होत असल्याने नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी व्हिडिओतील काही स्क्रीनशाॅट्स काढून रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधले असता First India News Rajasthan नावाच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ 25 जुलै रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. राजस्थानातील झुनझुनूमधील चिवरा गावातील ही दुर्घटना असल्याचे यात म्हटले आहे.
याशिवाय आम्हाला अमर उजालाच्या वेबसाईटवर देखील या दुुर्घटनेची बातमी आढळून आली.

याशिवाय राजस्थान पत्रिका या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर देखील या घटनेची बातमी देण्यात आलेली आहे. यात म्हटले की आहे की पेट्रोल पंप कर्मचा-यांच्या सतकर्तेमुळे दुर्घटना टळली.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये आग लागल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही तर राजस्थानमधील आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने वेगवेगळ्या शहरांच्या नावाने व्हायरल होत आहे.
Result: Misleading
Our Sources
राजस्थान पत्रिका- https://www.patrika.com/jhunjhunu-news/bike-catches-fire-at-petrol-pump-in-jhunjhunu-6295821/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.