Sunday, April 27, 2025
मराठी

Fact Check

फ्लोरिडामध्ये इमारत कोसळल्याचा जुना व्हिडिओ तुर्कीचा भूकंप म्हणून केला जातोय शेयर

Written By Prasad S Prabhu
Feb 7, 2023
banner_image

एका कोसळणाऱ्या इमारतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाचा असल्याचा दावा केला जात आहे.

तुर्की मध्ये झालेल्या भूकंपात कोसळणारी इमारत
Tweet@snp_inc

पोस्टचे संग्रहण येथे पाहिले जाऊ शकते.

पोस्टचे संग्रहण येथे पाहिले जाऊ शकते.

प्रत्यक्षात तुर्कस्तानमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी नोंदवण्यात आली आहे. तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा हवाला देत अहवालात असे लिहिले आहे की, या अपघातात 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 5000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Fact Check/ Verification

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही इनव्हिड टूल्सच्या मदतीने व्हायरल व्हिडिओचे काही मुख्य फ्रेम्स कॅप्चर केले. एक कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ नावाच्या टीव्ही चॅनेलच्या अधिकृत YouTube चॅनेलवर 25 जून 2021 रोजी प्रकाशित झालेला व्हिडिओ रिपोर्ट सापडला. त्यामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओचा एक भाग पाहता येईल. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे.

तुर्की मध्ये झालेल्या भूकंपात कोसळणारी इमारत
Courtesy: Wall Street Journal

शिवाय, काही कीवर्ड शोधांमुळे 25 जून 2021 रोजी ‘ABC 7’ च्या YouTube चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आला, जिथे व्हायरल व्हिडिओचा काही भाग उपस्थित आहे. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ फ्लोरिडाच्या मियामी बीचजवळील बारा मजली कॉन्डो टॉवर कोसळल्याचा आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

जून 2021 मध्ये या घटनेबाबत अनेक माध्यम समूहांनी रिपोर्ट प्रकाशित केले आहेत, ज्यामध्ये हा व्हिडिओ अमेरिकेतील फ्लोरिडा येथील असल्याचे सांगण्यात आले होते. हे रिपोर्ट येथे आणि येथे आढळू शकतात.

तपासादरम्यान, आम्हाला अमेरिकन मीडिया ग्रुप न्यू नेशनचे वरिष्ठ रिपोर्टर ब्रायन एंटिन यांनी 24 जून 2021 रोजी केलेले ट्विट आढळले. यामध्येही व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ फ्लोरिडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Conclusion

एकंदरीत, अमेरिकेतील फ्लोरिडा येथील इमारत कोसळल्याचा दीड वर्षे जुना व्हिडिओ शेअर करून तुर्कीमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाचा व्हिडीओ असल्याचा दिशाभूल करणारा दावा केला जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Result: False

Our Sources
Video Report by ‘Wall Street Journal‘ on June 25, 2021

Video Report by ‘ABC7‘ on June 25, 2021

Tweet by Brian Entin on June 24, 2021


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
No related articles found
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,944

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.