Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या दाव्याने सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या दुःखद निधनानंतर, एक Mi 17 क्रॅश लँडिंग दर्शविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे व्हिडिओमध्ये एक हेलिकॉप्टर डोंगराळ प्रदेशात हळू हळू खाली उतरत आहे आणि ब्लेडने जमिनीवर घासत असताना बाजूला झुकताना दिसत आहे. न्यूजचेकरला हा व्हिडिओ अरुणाचल प्रदेशमधील Mi 17 क्रॅश लँडिंगच्या दुसर्या घटनेतील असल्याचे आढळले आहे. हा व्हिडिओ जनरल बिपिन रावत यांचा समावेश असलेल्या हेलिकॉप्टर अपघाताशी संबंधित नाही.
व्हायरल शेअरचॅट पोस्ट इथे पहा.
व्हायरल शेअरचॅट पोस्ट इथे पहा.
हा दावा ट्विटरवर देखील व्हायरल झाला आहे.
संग्रहित ट्विट इथे पहा

न्यूजचेकरने व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी, मुख्य फ्रेम्स वापरून रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला.

अधिक शोध घेत असताना, आम्हाला Zee24 Taas च्या YouTube चॅनेलवर Mi 17 च्या क्रॅश लँडिंगचा असाच व्हिडिओ आढळला, जो नोव्हेंबर 2021 रोजी अपलोड केला गेला.
व्हिडिओमधील कॅप्शनमध्ये ही घटना अरुणाचल प्रदेशात घडल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पडताळणी केल्यावर, दोन्ही व्हिडिओ वेगळे असल्याचे आढळले.
पुढे पडताळणी करताना, Republic, The Economic Times, Zee News यासह अनेक माध्यमांनी लेखांमध्ये वापरलेला Mi 17 क्रॅश लँडिंगचा व्हिडिओ आम्हाला आढळला.

न्यूजचेकरला ANI या वृत्तसंस्थेने Mi 17 क्रॅश लँडिंगचे असेच फुटेज असलेले ट्विट देखील आढळले ज्यामध्ये ते अरुणाचल प्रदेशातील असल्याचे वर्णन केले आहे.
8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 नंतर, IAF ने ट्विट केले की जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत या अपघातातील 13 मृतांमध्ये होते. भारतीय वायुसेनेने (IAF) ट्विट केले की, “खूप खेदाने, आता हे निश्चित करण्यात आले आहे की जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत आणि विमानातील अन्य 11 जणांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे.”
जनरल रावत हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन (निलगिरी हिल्स) येथे स्टाफ कोर्समधील प्राध्यापक आणि विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी भेट देत होते. सुलूर येथील हवाई दल तळावरून सकाळी ११.४५ वाजता कोईम्बतूर, वेलिंग्टनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.
अशा प्रकारे, आम्हाला आढळलेल्या मीडिया रिपोर्ट्स आणि इंटरनेटवर उपलब्ध व्हिडिओंच्या आधारे, हे स्पष्ट होतो की की Mi 17 क्रॅश लँडिंगचा व्हिडिओ CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा (IAF Mi-17V5) अपघाताचा नाही. हा व्हिडीओ अरुणाचल प्रदेशातील या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अपघातातील आहे.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
August 17, 2025
Salman
August 11, 2025
Yash Kshirsagar
December 15, 2021