Monday, April 28, 2025
मराठी

Fact Check

सीरियन हेलिकॉप्टरचा व्हिडिओ जनरल बिपिन रावत यांच्या अपघाताचा म्हणून होतोय शेअर

Written By Yash Kshirsagar
Dec 9, 2021
banner_image

जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचा अहवाल आल्यानंतर काही तासांनंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी Mi17 जमिनीवर कोसळण्याआधी हवेत आग लागून फुटल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. न्यूजचेकरला हा व्हिडिओ सीरियाचा असल्याचे आढळले आहे आणि तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या दुःखद घटनेशी संबंधित नाही.

हा व्हिडिओ जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचा असल्याचा दावा शेअर केला जात आहे.

व्हायरल शेअरचॅट पोस्ट इथे पहा.

व्हायरल शेअरचॅट पोस्ट इथे पहा.

हा दावा ट्विटरवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/SirDonBradman/status/1468543949279166464
https://twitter.com/MarwadiClub/status/1468547484683161608

Fact Check/Verification 

जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅशचा दावा करणाऱ्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमद्ये संदर्भ देताना, अनेक युजर्सनी व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. @Patriot_005 या युजर्सने फेब्रुवारी 2020 च्या ट्विटची लिंक शेअर केली, ज्यामध्ये हाच व्हायरल व्हिडिओ आहे.

ट्विटमध्ये दावा केला आहे की हे सीरियन हेलिकॉप्टर होते आणि सीरियातील इदलिबमध्ये तुर्की समर्थित मिलिशियाने ते पाडले होते. व्हिडिओमध्ये ऑडिओ देखील आहे, ज्यामध्ये ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा दिल्याचा ऐकू येतो.

https://twitter.com/MarwadiClub/status/1468547484683161608

न्यूजचेकरने याच कीवर्डने शोध घेतला आणि हा व्हिडिओ The Telegraph च्या YouTube चॅनेलवर सापडला. यात म्हटले आहे की, ‘पूर्व इडलिबमधील नायरब भागात बंडखोरांकडून सीरियन वायुसेनेचे हेलिकॉप्टर पाडले जात आहे, अलिकडच्या दिवसांत तुर्कीने पुरवल्या जाणाऱ्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.’

AP वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांना या घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे.

अशा प्रकारे आम्हाला आढळून आले की मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला व्हिडिओ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचा नसून सीरियन Mi 17 हेलिकॉप्टरचा आहे.

8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 नंतर, IAF ने ट्विट केले की, अपघातातील 13 मृतांमध्ये जनरल रावत आणि त्यांची पत्नी श्रीमती मधुलिका रावत यांचा समावेश आहे. भारतीय वायुसेनेने (IAF) ट्विट केले की, “खूप खेदाने, आता हे निश्चित करण्यात आले आहे की जनरल बिपिन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि विमानातील अन्य 11 जणांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे.”

जनरल रावत हे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन (निलगिरी हिल्स) येथे स्टाफ कोर्समधील प्राध्यापक आणि विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी भेट देत होते. सुलूर येथील हवाई दल तळावरून सकाळी 11.45 वाजता कोईम्बतूर, वेलिंग्टनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

Conclusion

अशा प्रकारे, मीडिया रिपोर्ट्स आणि न्यूजचेकरला आढळलले YouTube व्हिडिओ हे पुष्टी करतात की जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅशच्या दाव्याने करणारे सोशल मीडियावर व्हायरल झालेल व्हिज्युअल सीरियातील जुन्या घटनेचे आहे.

Result: Misplaced Context/Partly False

Our Sources

The Telegraph

Associated Press


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,946

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.