नॅशनल जिओग्राफिकने कव्हर पेजवर आंदोलक शेतक-याचा फोटो छापला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पंजाबी एकता पार्टीचे अध्यक्ष व आमदार सुखपाल सिंह खैरा सह अनेकांनी आंदोलक शेतक-याचा फोटो असलेले नॅशनल जिओग्राफिकचे पेज कव्हर शेअर केले आहे. खैरा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गोदी मीडियाला लाज वाटली पाहिजे. बीबीसी, सीएनएन, नॅशनल जिओग्राफिक यांनी हे आंदोलन कव्हर केले, पण आपला राष्ट्रीय मीडिया या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

Fact Checking/Verification
व्हायरल होत असलेले नॅशनल जिओग्राफिकचे पेज कव्हर कधीचे आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता ग्राफिकच्या उजव्या बाजूला ‘विंटर २०२०’ असा उल्लेख करण्यात आल्याचे आढळून आले. यानंतर आम्ही या नियतकालिकाच्या वेबसाईटला भेट दिली. मागील वर्षीचे सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानचे पेज कव्हर तपासले, मात्र आम्हाला यामधील कुठल्याच अंकावर व्हायरल फोटो आढळून आला नाही.
पेजकव्हर बारकाईने पाहिले असता एके ठिकाणी @anoopreet नावाच्या हँडलचा उल्लेख करण्यात आल्याचे आढळून आले. याबाबत इंस्टाग्रामवर शोध घेतला असता anoopreet अकाउंटवर हा फोटो अपलोड केल्याचे आढळून आले. मात्र यातील पोस्टशेवटी हे काल्पनिक कव्हर पेज असल्याचे नमूद केले आहे.

मात्र हा फोटो कुठला आणि कधीचा आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला या पीटीआय वृत्तसंस्थेच्ये फोटो जर्नालिस्ट रवि चौधरी यांनी हा फोटो काढल्याचे आढळून आले. तो फोटो वापरुन अनुप्रितने नॅशनल जिओग्राफिकचे काल्पनिक कव्हर तयार केले.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, नॅशनल जिओग्राफिकने आपल्या कव्हर पेजवर दिल्लीतील आंदोलक शेतक-याचा फोटो छापलेला नाही, सोशल मीडियात काल्पनिक पेज कव्हर खरे म्हणून व्हायरल झाले.
Result: Manipulated Media
Our Sources
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/p/CJTvV5RJONQ/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.