कोलंबियातील बसेसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याच्या दाव्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये एका बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांचा फोटो दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेत आज देखील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला जातो. अमेरिका त्यांना आदर्श मानते.

Fact Check/Verification
आम्ही कोलंबियातील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी गूगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला विकिपीडियावर बसचा फोटो आढळून आला मात्र यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आढळून आला नाही. विकिपीडियाच्या माहितीनुसार हा फोटो लंडनमधील टूर बसचा आहे.

godfullyknown नावाच्या ब्लाॅगमध्ये देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे मात्र यात देखील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही.

Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की कोलंबियातील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांचा फोटो नाही, दोघांचा जुना फोटो माॅर्फ करुन सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेला आहे.
Result- False
Sources
विकिपीडिया- https://es.wikipedia.org/wiki/Archivo:Tour_bus_in_bath_england_arp.jpg