राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी कंगणा रानौतचे समर्थन केल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात येत आहे. राज ठाकरे यांचे यासंदर्भातले हिंदीमध्ये केलेल ट्विट देखील व्हायरल झाले आहे. याशिवाय राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील कंगणाच्या समर्थनात पुढे आल्याचा दावा केला जात आहे.
राज ठाकरे यांनी हे ट्विट संजय राऊत यांना उद्देश्यून केले आहे. त्यांनी संजय राऊत यांना हिंदीत कंगणाला मुंबईत येऊ न देण्यावरुन प्रश्न विचारला आहे.
Fact Check / Verification
राज ठाकरे यांनी खरंच कंगणा रानौत हिच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे का याची पडताळणी करण्याचे आम्ही ठरविले असता आम्हाला एक फेसबुक पोस्ट आढळून आली ज्यात शर्मिला ठाकरे यांनी कंगणाला मुंबईत येण्यापासून कोण रोखतंय ते बघू शिवाय ती माझी मुलगी आहे अशा आशय आहे.
याबाबत काही किवर्डसच्या आधारे शोध सुरु केला, मात्र राज ठाकरे किंवा शर्मिला ठाकरे यांनी कंगणा रानौत च्या समर्थनार्थ ट्विट केल्याची बातमी माध्यमांत आढळली नाही. मात्र आम्हाला एबीपी माझाची एक बातमी आढळून आली. ज्यात राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाने कगंणाच्या समर्थनार्थ फेक ट्विट करण्यात आल्याचे म्हटले आहे.
यानंतर आम्ही राज ठाकरे यांच्या व्हायरल ट्विटर अकाउंटचा शोध घेण्याचे ठरविले बारकाईने पाहिले असता ज्या ट्विटर अकाउंटवरुन राज ठाकरे यांनी कंगणाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे ते ट्विटर अकाऊंट राज ठाकरे यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट नसल्याची एक काॅमेंट वाचायला मिळाली.

बारकाईने हे ट्विटर अकाउंट पाहिल्यास मागील महिन्यातच सुरु केल्याचे आढळून आले. शिवाय यावर जास्त एकही ट्विट मराठीत नसल्याचे आढळून आले.

यानंतर आम्ही राज ठाकरे यांचे ओरिजनल ट्विटर अकाउंट शोधले असता ते @RajThackeray हे असल्याचे आढळून आले. या ट्विटर हॅंडलवर राज ठाकरे यांनी कंगना रानौतच्या समर्थनार्थ कोणतेही टविट केल्याचे आढळून आलेले नाही. शिवाय हे अकाउंट तीन वर्षापूर्वी सुरु केले असल्याचे आढळून आले असून 3 सप्टेंबर 2020 नंतर याद्वारे ट्विट करण्यात आलेले नाही.

राज ठाकरेंचे ओरिजनल ट्विटर अकाऊंट इथे पाहा
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, राज ठाकरे यांच्या नावे फेक ट्विट अकाउंट सुरु करुन त्याद्वारे कंगणा रानौतच्या समर्थनार्थ ट्विट केले गेले आहे. यातून राज ठाकरे यांचे कंगणाला समर्थन आहे असा चुकीचा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाला. राज ठाकरे यांनी या प्रकरणात कोणतेही ट्विट केले नसल्याचे तसेच शर्मिला ठाकरे यांनी कंगनाचे समर्थन केले नसल्याचे आमच्या पडताळणीत आढळून आले.
Result- False
Sources
Raj Thackeray Twitter- https://twitter.com/RajThackeray
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.