साधूंनी मुंबईकडे कूच केले असल्याचा दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये हजारों साधुंची मोठी गर्दी दिसत आहे. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार या तुफानाला रोखू शकत नाही. साधू समाजाची मुंबईकडे कूच करण्याची तयारी.
याशिवाय आम्हाला हा व्हिडिओ फेसबुकवर याच दाव्याने मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

Fact Check/Verification
साधुंनी नेमके कुठून मुंबईकडे कूच केले आहे याची पडताळणी आम्ही सुरु केली. अधिक शोध घेतला असता आम्हाला पालघरमधील साधू हत्याकांडानंतर एप्रिल महिन्यात देखील हाच दावा व्हायरल झाल्याचे आढळून आले.
यावरुन लक्षात आले की हा व्हिडिओ सध्याचा नाही. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा अधिक शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली. यातील काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने तपास केला असता आम्हाला हा व्हिडिओ प्रयागराज भ्रमण या यूट्यूब चॅनलवर जानेवारी 2020 अपलोड केल्याचे आढळून आले.यात म्हटले आहे की प्रयागराज येथे मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्या दरम्यानचा साधूंची गर्दीचा हा व्हिडिओ आहे.
सन 2019 मध्ये प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. काही किवर्डसच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली असता अपना अवध या यूट्यूब चॅनलवर एप्रिल 2019 मध्ये अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळून आला.
याशिवाय आम्हाला मार्च 2019 मध्ये एका ट्विटर हॅंडलवर हा व्हिडिओ शेअर केल्याचे आढळून आले.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ मुंबईकड कूच केलेल्या साधुंचा नसून मागील वर्षी उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यानचा आहे.
Result- Misleading
Our Sources
Apana Avadh- https://www.youtube.com/watch?v=r9XbwDsVhGw
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.