पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहे, जे इस्लामिक कलीमत वाचतांना दिसत आहे. यात दावा केलाय की, हा व्हिडिओ सौदी अरेबियातील असून यात दिसणारे लोक भारतात पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत आहे.
या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे आणि इथे पाहू शकता. पैगंबर मोहम्मद यांच्या घटनेशी जोडून फेसबुक आणि ट्विटरवर काही युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी टीव्ही कार्यक्रमातील एका चर्चेत भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपाचे माजी मीडिया सेलचे प्रमुख नवीन जिंदल यांनी देखील पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान ट्विटवरून पोस्ट केले.
या दोघांनी केलेल्या विधानाचा सौदी अरेबियासहित अन्य काही इस्लामिक देशांनी याचा विरोध केला आहे. मग भाजपाने दोन्ही प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आता पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानासंबंधित सौदी अरेबियातील लोक एकत्र आले, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आधी याची तथ्य पडताळणी हिंदीत केली आहे, तुम्ही ते इथे वाचू शकता.
Fact Check / Verification
पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानासंबंधित सौदी अरेबियातील लोक एकत्र आले, याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील एक की-फ्रेम यांडेक्सवर रिव्हर्स सर्च करून शोधली. तेव्हा आम्हांला Althawranews नावाच्या एका संकेतस्थळावर एक बातमी मिळाली.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीत व्हायरल व्हिडिओशी मिळते-जुळते काही फोटो दिसले. त्या बातमीनुसार, फोटो यमनची राजधानी साना येथील आहे, जिथे पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिवसानिमित्त लाखो लोकांची गर्दी जमली होती.
त्यानंतर काही कीवर्ड गुगलवर टाकून आम्हांला व्हायरल व्हिडिओसारखा आणखी एक दुसरा व्हिडिओ व्हॉईस ऑफ अमेरिका या यु ट्यूब वाहिनीवर मिळाला. तिथेही हा व्हिडिओ नोव्हेंबर २०१९ रोजी अपलोड केला होता. त्यात सांगितले होते की, यमनमध्ये मुस्लिमांनी पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस साजरी केला. यमनचा याच दरम्यानचा एक व्हिडिओ गेटी इमेजच्या संकेतस्थळावर देखील आपण जाऊ शकतो.
हे देखील वाचू शकता : व्हायरल व्हिडिओ पैगंबर मोहम्मद यांच्यावर नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या संबंधित आहे? याचे सत्य जाणून घ्या
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ सौदी अरेबियाचा नसून यमनचा आहे आणि तो अडीच वर्षांपूर्वीचा आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानासंबंधित सौदी अरेबियातील लोक एकत्र आले, असा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासोबत जोडत तो शेअर केला जात आहे.
(या तथ्य पडताळणीचे न्यूजचेकर मराठीने हिंदीतून अनुवाद केला आहे)
Result : False Context/False
Our Sources
९ नोव्हेंबर २०१९ रोजी Althawranews यांची प्रकाशित झालेली बातमी
११ नोव्हेंबर २०१९ रोजी व्हॉईस ऑफ अमेरिका यांनी अपलोड केलेली यु ट्यूब व्हिडिओ
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.