भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, 26 जानेवारी रोजी या सेक्युलर महिलेने भारतमातेच्या फोटोची पुजा करण्यास विरोध केला व फोटो हिसकावून घेतला.
सोशल मीडियात भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोस्टमध्ये म्हटले आहे की, बघा काय परिस्थिती आहे 26 जानेवारीला…. भारतमातेच्या फोटोच्या पूजनाला कशी विरोध करते ही *so called secular* महिला….., एवढी दादागिरी करतात?! महाराष्ट्रात नक्की हिंदुत्ववादी सेनेचीच सरकार आहे ना……?, एवढी हिंमत येते कशी या लोकांना….? अजुन जे नालायक सेक्युलर आहेत ते या गोष्टीलापण सपोर्ट करतील…..
मुख्यमंत्री साहेब काय चाललंय या महाराष्ट्रात???अजूनही गप्प बसणार का खुर्चीसाठी???

फेसबुक पोस्ट इथे पहा.
फेसबुकवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आमच्या वाचकांकडून व्हॉट्सअॅप नंबरवर भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ प्राप्त झाला असून तो तपासण्याची विनंती करऑण्यात ऑआली आहे.
भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ बद्दल दाव्याची सत्यता पडताळून करण्यासाठी,आम्ही काही किवर्डसच्या साहाय्याने शोद घेतला असता @DeepikaBhardwaj हँडलद्वारे केलेल एक ट्विट आढळून आले पंरतु यात कोणत्याही जातीय व धार्मिक अॅंगल आढळून आला नाही.
त्याच थ्रेडमध्ये, @DeepikaBhardwaj पुढे एक ट्विट टॅग करतात
याशिवाय आम्हाला टाईम्स नाऊ मराठीच्या वेबसाईटवर 27 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित झालेली बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, एकीकडे काल संपूर्ण देशात भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला तर दुसरीकडे ठाण्यातील एका घटनेने या कार्यक्रमाला गालबोट लागले. घटना ठाण्यातील कोलशेत भागात असलेल्या लोढा अमारा या उच्चभ्रू सोसायटीतील असून इथे आज सकाळी भारतमातेच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील रहिवासी्यांनी एकत्र येत हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु याचं वेळी तेथेच राहणाऱ्या एका महिलेने भारतमातेचा फोटो हिसकावून घेतला आणि मोठा हंगामा केला. भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
या बातमीत भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ ठाण्यातील कापुरबावडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याचे समजले. आम्ही पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यु.डी. सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “ती महिला मानसिक रुग्म आहे आणि 26 जानेवारी रोजी लाऊडस्पीकरचा आवाज तिला सहन होत झाला नाही ती खाली आली आणि प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आहे हे काय चालले आहे ते विचारू लागली. तसेच तिने भारतमातेचा पोटो सुरक्षागार्डकडून हिसकावून घेतला ते कुणीतरी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले गेले, जे आता तो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल होत आहे,”
Conclusion
आमच्या पडताळणीत भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले, सदर महिला ही मुस्लिम किंवा सेक्युलर नाही तर मनोरुग्ण आहे.
Result: False Context/False
Sources
Thane Police
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा