Thursday, April 24, 2025
मराठी

Fact Check

Fact Check: तामिळनाडूहून बहराइचला जाणाऱ्या फटाक्यांनी भरलेल्या ट्रकला लागलेल्या आगीचा व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल

Written By Saurabh Pandey, Translated By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Jan 18, 2024
banner_image

Claim

राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात जल्लोष करण्यासाठी फटाके वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत व्हायरल केला जात आहे.

Fact Check: तामिळनाडूहून बहराइचला जाणाऱ्या फटाक्यांनी भरलेल्या ट्रकला लागलेल्या आगीचा व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
Viral Claim
Fact Check: तामिळनाडूहून बहराइचला जाणाऱ्या फटाक्यांनी भरलेल्या ट्रकला लागलेल्या आगीचा व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल
Vial Claim

Fact

राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी फटाके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये आगीच्या नावाखाली शेअर केल्याच्या दाव्याची चौकशी करत असताना, उन्नाव पोलिसांनी या व्हायरल दाव्याला उत्तर दिल्याचे आम्हाला समजले. हा ट्रक फटाक्यांनी भरला होता, अशी माहिती त्यांच्या ट्विटमध्ये देण्यात आली आहे. फटाके तामिळनाडूहून बहराइचला जात होते. ट्विटनुसार, “आज 17.01.2024 रोजी पहाटे 4:00 वाजता, ट्रक क्रमांक TN 28 AL 6639 ज्यामध्ये फटाके भरलेले होते, पोलीस स्टेशन पूर्वा क्षेत्रांतर्गत खारगीखेडा गावाजवळ अज्ञात कारणांमुळे आग लागली. माहिती मिळताच पूर्वा पोलीस ठाणे व अग्निशमन दलाने आग पूर्णपणे विझवली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक रस्त्यावरून हटवण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत सुरू आहे. पोलिसांनी ट्रक मालकाशी बोलल्यानंतर सदर ट्रक तामिळनाडूहून बहराइचला जात होता, त्यात फटाके, लहान मुलांचे पोस्टर्स, चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर्स आणि दुकानाच्या पुरवठ्यासाठी धार्मिक पोस्टर्स भरलेले होते.”

याशिवाय 17 जानेवारी 2024 रोजी Aaj Tak आणि News18 ने प्रकाशित केलेल्या बातम्यांमध्ये पुरवाच्या पोलीस अधिकारी सोनम सिंह यांची प्रतिक्रियाही प्रसिद्ध झाली आहे. सोनम सिंह यांच्या म्हणण्यानुसार, “फटाक्यांनी भरलेला हा ट्रक बहराइचला जात होता, मात्र अज्ञात कारणामुळे पहाटे 4 वाजता खर्गीखेडा गावाजवळ ट्रकला आग लागली. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली असून या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.”

याशिवाय दैनिक भास्करच्या पत्रकार ममता त्रिपाठी ज्यांनी ट्रक अयोध्येला गेल्याचा दावा केला होता, यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये सीओ सोनम सिंह यांचे व्हिडिओ स्टेटमेंट देखील आहे, इतर अनेक स्थानिक पत्रकारांनी ट्रक बहराइचला जात असल्याचे सांगितले आहे.

अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, राम मंदिराचा अभिषेक साजरा करण्यासाठी फटाके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये आग लागण्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक हा फटाक्यांनी भरलेला ट्रक बहराइचला जात होता, मात्र अज्ञात कारणामुळे पहाटे 4 वाजता खरगीखेडा गावाजवळ ट्रकला आग लागली.

Result: Partly False

Our Sources
Tweets shared by Unnao Police and journalists
Media reports


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,893

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.