Tuesday, April 29, 2025
मराठी

Fact Check

ऑस्ट्रेलिया मध्ये ब्राह्मण बीफ विकत आहेत का? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

Written By Yash Kshirsagar
Mar 4, 2020
banner_image

Claim-   

आॅस्ट्रेलिया मध्ये ब्राह्मण बीफ विकत आहेत आणि भारतात ते गाय वाचवण्यासाठी दुस-यांना मारत आहेत.

Verification
Adaa Arora नावाच्या ट्विटर हॅंडलवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पणतू डाॅ. राजरत्न आंबेडकर यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात आंबेडकर यांनी दावा केला आहे की आॅस्ट्रेलियामध्ये ब्राह्मण पाइस नावाची कंपनी आहे. ही कंपनी ब्राह्मण लोक चालवतात या कंपनीचे काम बीफ विकण्याचे आहे, म्हणजे हे को गाईला माता म्हणतात आणि तिलाच मारुन मांस विकतात आणि भारतात गाय वाचवण्यासाठी दुस-यांना मारत आहेत.
या व्हिडिओमध्ये Brahman Pies नावाच्या कंपनीच्या आउटलेट समोर त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती चर्चा करताना दिसत आहे. दोघांचेही म्हणणे  आहे का हा ब्रॅंड अनेक मांसाहारी उत्पादने विकत आहेत आणि याचे मालक ब्राह्मण आहेत.
राजरत्न आंबेडकर करत असलेल्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे याची पडताळणी करण्याचे ठरविले. याबाबत शोध घेतला असता आम्हाला  आम्हाला ब्राह्मण पाइस कंपनीची एक फेसबुक पोस्ट आढळून आली. यात म्हटले आहे की, यात कंपनीने सांगितले आहे कि आम्ही पूर्णपणे आॅस्ट्रेलियन आहोत भारतीय ब्राह्मण जातीशी आमचा कोणताही संबंध नाही. ब्राह्मण ही आॅस्ट्रेलियातील गायीची एक प्रजात आहे तिच्या नावावरुनच आम्ही हा ब्रॅंड सुरु केला आहे. सोशल मीडियामध्या आमच्या ब्रॅंडच्या नावाने चुकीचा प्रचार केला जात आहे. व्हायरल व्हिडिओकर्त्याने आमच्याशी कधीही संपर्क करुन सत्य काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.
यानंतर आम्ही आॅस्ट्रेलियातील ब्राह्मण जातीच्या गायीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आॅस्ट्रेलियन ब्राह्मण ब्रिडर्स असोसिएशन च्या वेबसाईटवर या गो वंशाविषयी माहिती मिळाली. यात म्हटले आहे कि, ह्या गोवंशाचा जन्म इ. स 1900 नंतर अमेरिकेत झाला. तिथे ब्रिटिश आणि भारतीय गोवंशाचे जीन्स पासून ब्राह्मण गोवंश तयार करण्यात आला. आॅस्ट्रेलियात हा गोवंश मोठ्या प्रमाणात आढळतो. याची अनेक देशांत निर्यात होते. या गोवंशाचा फोटो आम्हाला आलेमी या वेबसाईटवर आढळून आला.
यावरुन हेच स्पष्ट होते की ऑस्ट्रलिया ब्राह्मण नावाचा गोवंश आहे, तसेच तेथील ब्राह्मण पाइस या कंपनीचा भारताशी किंवा भारतातील ब्राह्मण या जातीशी कसलाही संबंध नाही.
Sources
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,962

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.