Claim–
पुत्रपाप्तीसाठी एका 75 वर्षीय वृद्धाने आपल्याच 15 वर्षीय मुलीशी लग्न केले.
Verification–
शेअरचॅटवर एका यूजर ने एका वृद्धाचा आणि साडी नेसलेल्या मुलीचा फोटो शेयर केला असून या फोटो विषयी दावा करण्यात आला आहे की, या 75 वर्षीय वृद्धाने पुत्रप्राप्तीसाठी आपल्याच 15 वर्षीय मुलीची लग्न केले आहे. आता आपलीच मुलगी मुलाला जन्म देेणार वा रे तुझा धर्म.
आम्ही व्हायरल फोटोची सत्यता पडताळून पाहण्याचे ठरविले. काही कीवर्डसच्या साहाय्याने आम्ही शोध घेतला असता पण आम्हाला याबाबत काही माहिती आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल पोस्टमधील फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधले असता आम्हाला याबद्दलच्या काही बातम्या आढळून आल्या.
याशिवाय आम्हाला
एनडीटीव्हीची ही बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की ओमान येथील एक 65 वर्षीय शेख ने हैद्राबादमधील 16 वर्षीय शालेय मुलीशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. शेखने यासाठी पाच लाख रुपये दिले होते. मुलीच्या आईचा आरोप आहे की तिला याबद्दल काही माहिती नव्हते, मुलीचे या वृद्धाशी जबरदस्तीने लग्न लावण्यात येत होते.
याशिवाय इतर माध्यमांत ही बातमी आढळून आली.
याशिवाय यूट्यूबवर टाईम्स आॅफ इंडियाच्या बातमीचा व्हिडिओ देखील आढळून आला. यात बातमीत म्हटले आहे कि एका महिलने आरोप केला आहे कि आपल्या अल्पवयीन मुलीचे ओमानमधील वयोवृद्ध शेखशी लग्न लावण्यात आले आहे. ही बाब तिच्या पती ने आणि बहिणीच्या नव-याने तिच्यापासून लपवून ठेवली होती. रमझानच्या महिन्याआधी हा शेख भारतात आला होता. महिलेच्या पतीला आणि पाच लाख रुपये दिले होते.
यावरुन हेच स्पष्ट होते की, एक वयोवृद्ध पित्याने पुत्रप्राप्तीसाठी आपल्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले नसून. ओमानमधील एका वयोवृद्ध शेख ने हैद्राबादमधील अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले होते. सोशल मीडियात दोघांचा फोटो चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल होत आहे.
Sources
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)