Claim– शरद पवारांच्या दबावामुळे
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद होत असल्याचा डाॅ. अमोल कोल्हे यांनी केला गौप्यस्फोट.

Verification–
सोशल मीडियामध्ये स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेसंदर्भात काही पोस्ट व्हायरल होत आहेत. अशीच एक पोस्ट आम्हाला फेसबुकवर आढळून आली. पोस्टमध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या बातमीचा स्क्रिनशाॅट शेयर आला आहे, यात म्हटले आहे की अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट.. शरद पवारांच्या दबावामुळे बंद केली स्वराज्यरक्षक संभाजी मालिका… मुस्लिम मते फुटू नयेत म्हणून ही खेळी…सर्वांनी ही बातमी शेअर करा.
याशिवाय आणखी काही फेसबुक पोस्ट देखील व्हायरल होत आहेत.
आम्ही याबबात पडताळणी सुुरु केल्यानंतर स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी याबद्दल अधिकृत फेसबुक पेजवर पोस्टद्वारे खुलासा केल्याचे आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेविषयी खोट्या पोस्ट सोसळ मीडियात पसरवण्यात येत आहेत. मात्र ही मालिका झी मराठी वाहिनीवर रोज रात्री 9 वाजता प्रसारित होत असताना असी अफवा पसरवणे चुकीचे आणि दुर्देवी आहे.
आम्ही एबीपी माझाच्या बातमीची सत्यता तपासण्याचे ठरविल. एबीपीच्या ट्विटर हॅंडलवर आम्हाला याबाबत स्पष्टीकरण आढळून आले. या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांकडे एबीपी माझाने अक्षय देहनकर या इसमाला अटक करण्याची मागणी केली आहे. यात म्हटले आहे की, अक्षय देहनकर हा व्यक्ती एबीपी माझाचा लोगो, इमेजेस फोटोशॉप करुन बनावट तसेच समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर अर्थात ‘फेक न्यूज’ प्रसारीत करत आहे.अशी कुठलीही बातमी ‘माझा’ने प्रसारीत केली नाही.त्यामुळे या व्यक्तीवर तातडीनं कारवाई करावी ही विनंती.
मुंबई पोलिसांनी याची दखल घेतली आहे.
डाॅ. अमोल कोल्हे यांनी देखील ट्विटरवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात खोटी माहिती पसरवणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली केली आहे.
याशिवाय आम्हाला डाॅ. कोल्हे यांनी याबाबत केलेल्या खुलाशाचा वर कारवाई करण्याच्या मागणीचा व्हिडिओ देखील मिळाला.
यावरुन हेच स्पष्ट होते की डाॅ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका बंद होत नसल्याचा खुलासा केलेला नाही. एबीपी नावाचा बनावट स्क्रीनशाॅट वापरुन ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेली आहे.
Sources
Facebook Search
Twitter Search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)