Copyright © 2022 NC Media Pvt. Ltd. All Rights Reserved.
Fact Check
हा स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो नाही, जाणून घ्या सोशल मीडियात व्हायरल दाव्याचे सत्य
Claim–
श्री स्वामी समर्थांचा हा ओरिजनल फोटो आहे. जास्तीत जास्त शेअर करा.

Verification–
फेसबुकवर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशीच एक पोस्ट Seema Pawar या यूजरने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्री स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो दिसताच दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरुन दुसरे पण दर्शन घेऊ शकतील.
याआधी देखील स्वामी समर्थांचे फोटो शेअर झाले होते. यामळे हा फोटो खरंच स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो आहे का याचा शोध घेण्याचे आम्ही ठरवले. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा फोटो https://mas-india.com/ या वेबसाईटवर आढळून आला. हा फोटो गणेशपुरी येथील भगवान नित्यानंद यांचा असल्याचे म्हटले आहे. हा फोटो या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

आखणी एका वेबसाईटवर त्यांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. याशिवाय sadgurunityananda.com या वेबसाईटवर देखील फोटो गॅलरीत अनेक फोटो आढूळन आले. त्यांचे हे फोटो डी सुवर्णा नावाच्या फोटोग्राफरने काढले आहेत.

स्वामी नित्यानंद कोण होते याबद्दल सामना या दैनिकातील लेखात माहिती देण्यात आली आहे.

तसेच एम. डी सुवर्णा हे भगवान नित्यानंद यांचे फोटोग्राफर असल्याचा माहिती मिळाली.

यावरुन हेच स्पष्ट होते की, सोशल मीडियात स्वामी समर्थाच्या नावाने भगवान नित्यानंद यांचा फोटो व्हायरल होत आहे.
Sources
Facebook Search
Google Reverse Image
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.