हेलिकाॅप्टर- टेम्पो अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात येत आहे. यात एक हेलिकाॅप्टर एका रहदारीच्या रस्त्यावरुन उड्डाणाच्या तयारीत असताना पंख्याला एक टेम्पो धडक देतो आणि हेलिकाॅप्टरचे नुकसान होते असे या व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ भारतीतल असल्याचा दावा केला जात असला तरी तो कोणत्या शहरातील आहे पोस्टमध्ये सांगितलेले नाही.
Fact Check / Verification
आम्ही या व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याचे ठरविले. यासंदर्भात काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला फेसबुक आणखी एक पोस्ट आढळून आली.
या पोस्टमध्ये ही घटना नेमकी कोणत्या शहरात घडली याची माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे आम्ही हा अपघात कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता. हा अपघात अमृसरमधील असल्याचे ट्विट आढळून आले.
याशिवाय एक फेसबुक पोस्ट देखील आढळून आली ज्यात हा अपघात अमृतसरमध्ये घडल्याचा दावा केला गेला आहे.
आम्ही या अपघाताविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमांत यासंदर्भात बातम्या आढळून आल्या नाहीत. यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतील काही फ्रेसम्स रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला.
या शोधा दरम्यान आम्हाला 21 जानेवारी 2020 रोजी यूट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की, ब्राझीलमधील रियो ब्रांको या शहरात हा अपघात घडल्याचे म्हटले आहे. पोलिसांचे हेलिकाॅप्टर उड्डाणाच्या तयारीत असताना जैविक कचरा वाहणा-या ट्रकने हेलिकाॅप्टरच्या पंख्याला धडक दिली आणि हा अपघात घडला.
याशिवाय Daily Mail या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर देखील 21 जानेवारी रोजी ही बातमी प्रसिद्ध झाली होती.

Conclusion:
यावरुन हेच स्पष्ट होते की हेलिकाॅप्टर-टेम्पोच्या अपघाताचा व्हिडिओ हा भारतातील नसून ब्राझीलमधील आहे. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Result: Misleading
Our Sources:
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.