Saturday, November 23, 2024
Saturday, November 23, 2024

Yearly Archives: 2023

Weekly Wrap: हिमालयातील मणिदर्शन सूर्योदय, जैन मुलीला केले परत, ज्ञानव्यापी शिवलिंग ८ हजार वर्षे जुने आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही सोशल मीडियावरील खोट्या पोस्टनी गाजला. हिमालयात दिसणारा मणिदर्शन सूर्योदयाचा व्हिडीओ असा दावा झाला. दक्षिणेतल्या नेल्लोर येथे पळविलेल्या जैन मुलीला नोकरी जाण्याच्या भीतीने मुस्लिमांनी परत आणून दिले. असा दावा करण्यात आला. ज्ञानवापी शिवलिंगाचे कार्बन डेटिंग झाले असून ते आठ हजार वर्षे जुने आहे. असा दावा करण्यात आला. नाशिक येथील मुलगा मुंबई येथील रेल्वेस्थानकावर सापडला आहे, असे सांगत एक दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: व्हीटी स्टेशनला सापडलेला हा मुलगा आठ महिन्यांपूर्वीच पालकांकडे झालाय सुपूर्द

अवघ्या दोन वर्षांचा मुलगा मुंबईच्या सीएसएमटी रेल्वेस्टेशनवर सापडला असून तो नाशिक भागातील असू शकतो. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

ज्ञानवापी ‘शिवलिंग’चा कार्बन डेटिंगचा अहवाल असल्याचा दावा करणारी ही पोस्ट खोटी आहे

कार्बन डेटिंगच्या अहवालानुसार काशी विश्वनाथ शिवलिंग 8 हजार वर्षे जुने आहे.

Fact Check: हिमालयातील खास ‘मणिदर्शन सूर्योदय’ म्हणून स्वीडिश व्हिडिओ व्हायरल

हा मणिधरसन नावाचा चमत्कारिक सूर्योदय आहे जो हिमालयात पहाटे ३:३० वाजता होतो. यात ३ नाड्या (इडा, पिंगळा, सुषमा) आहेत आणि त्याला वर्धमान असेही म्हणतात. याला भगवान शिवाचे विश्वरूप दर्शन असेही म्हणतात. असा दावा करीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check: नोकऱ्या जाण्याच्या भीतीने मुस्लिम समाजाने पळविलेल्या हिंदू जैन मुलीला परत केले? सत्य येथे वाचा

मुस्लिमासाठी जैन समाजाने उचललेले निर्णायक पाऊल किंवा प्रत्येक हिंदूभाईने उचलावे असे एक पाऊल असे सांगत एक मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून हा मेसेज सर्वत्र फॉरवर्ड होऊ लागला आहे.

डोळे आलेत? सेल्फ मेडिकेशन नको, ही घ्या काळजी

डोळे येण्याची साथ सध्या सर्वत्र काळजीचा विषय बनला आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला आय फ्लू किंवा कंजक्टिव्हायटीज (Conjunctivitis) असे सुद्धा म्हणतात. या आजाराला पिंक आय असेही संबोधले जाते. ही साथ आली आणि अनेकांचे डोळे गुलाबी आणि लाल होऊ लागले आहेत. डोळे चुरचुरत असतानाच या विषयावरील अनेक पोस्ट अनेकांचे डोळे दुखवून टाकत आहेत. दरम्यान हा आजार काय आहे, काळजी काय घ्यायची आणि औषधोपचार कसे केले जातात याबद्दल आपण या एक्सप्लेनर च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Weekly Wrap: बलात्कार प्रकरणात सावरकरांना शिक्षा, पाच हजारात अँजिओग्राफी, राणीला द्यावी लागते पेन्शन आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर खोट्या माहितीचा पाऊस पडला. हिंदू संत व्हिडिओत महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला, असा दावा झाला. मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून खर्च फक्त ₹5000 आहे, असा दावा करण्यात आला. मार्गारेट लॉरेन्स नामक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1908 मध्ये दोषी ठरल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगवास घडला होता, असा दावा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या वेळी नेहरू आणि गांधींनी चटकन सत्ता मिळवण्याच्या लालसेने इंग्रजांशी सत्ता हस्तांतरणाचा करार केला आणि ब्रिटनच्या राणीला पेन्शन देण्याचे मान्य केले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: ‘सत्ता हस्तांतरणाचा करार’ आणि राणी एलिझाबेथच्या पेन्शनबद्दलचा दावा खोटा आहे

सोशल मीडिया युजर्स एक संदेश शेयर करत आहेत, ज्यामध्ये ब्रिटीशांपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या परिस्थितीबद्दल आणि त्या काळात झालेल्या सत्ता हस्तांतरणाच्या कराराबद्दल चर्चा केली जात आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

Fact Check: श्रीलंकेतील बौद्ध भिक्खूला मारहाणीचा व्हिडिओ हिंदु संताच्या नावाने व्हायरल

अर्धनग्न अवस्थेत एक पुरुष आणि दोन महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोक व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिला आणि पुरुष यांना मारहाण करीत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ देखील बनवत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स दावा करत आहेत की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती एक हिंदू संत आहे ज्याला लोकांनी महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले आहे.

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही, खोटा आहे हा दावा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित करून वाद निर्माण केले जातात. सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर वादळे उठविण्यात आली. आता त्यांच्या तुरुंगवारीबद्दल वाद निर्माण करणारा एक दावा केला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read