Saturday, November 23, 2024
Saturday, November 23, 2024

Yearly Archives: 2023

Weekly Wrap: व्हीआयपी बॅगवरचा आरोप, विंग कमांडर अभिनंदनचे कथित विधान आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

खोट्या माहितीचा पाऊस पाडण्यात मागील आठवडाही अपवाद राहिला नाही. अनेक चुकीच्या माहितीचे दावे धुमाकूळ घालून गेले. उष्माघाताने काहींचा मृत्यू झाल्याने ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार परत देणार असे विधान पत्राद्वारे केल्याचा दावा झाला. विंग कमांडर अभिनंदन याने पुलवामा हल्ला हा भाजपचा पूर्वनियोजित डाव होता असे म्हटल्याचा दावा झाला. शुभेच्छा संदेशातून फिशिंग कोड पाठवून हॅकर्स वैयक्तिक बँकिंग माहिती चोरू शकतात, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देणारी जाहिरात व्हीआयपी बॅग कंपनीने बनविली आहे आणि महामार्गावरील बिबट्याचा व्हिडीओ पुणे आणि नागपूर जवळील आहे या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक आपण या रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत.

Fact Check: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, भाजपच्या सत्तेत पुनरागमनाचे भाकीत करणारे बनावट ‘बीबीसी सर्वेक्षण’ व्हायरल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, बीबीसीच्या नावे एक कथित मतदानपूर्व सर्वेक्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहे. कथित सर्वेक्षणात कर्नाटकात भाजपच्या “प्रचंड बहुमताने” पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात भाजपला 140 हून अधिक जागा मिळतील, तर काँग्रेसला 58 ते 66 जागा आणि जेडीएसला 22 ते 29 जागा मिळतील असे म्हटले आहे.

Fact Check: व्हीआयपी बॅगची जाहिरात म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ एडिटेड आहे

व्हीआयपी बॅग कंपनीच्या जाहिरातीचा व्हिडीओ असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कंपनीने लव्ह जिहादशी संबंधित व्हिडीओ बनवून आपली जाहिरात केली आहे. या कंपनीवर कारवाई करावी असा दावा केला जात आहे.

Fact Check: शुभेच्छा संदेशांमधून हॅकर्स चोरतात खासगी बँकिंग तपशील?

उद्यापासून, कृपया नेटवर्क चित्रे पाठवू नका. असे सांगणारा एक भलामोठा टेक्स्ट मेसेज सध्या व्हाट्सअपवर फिरू लागला आहे. हॅकर्स फिशिंग कोड घालून शुभेच्छा संदेश बाहेर पाठवीत आहेत. हा मेसेज स्वीकारणाऱ्यास आणि पुढे पाठविल्यानंतर इतरांसाठी धोक्याचा ठरू शकतो. कारण या फिशिंग कोडमुळे प्रत्येकाची वैयक्तिक बँकिंग माहिती उघड होऊ शकते. असे हा मेसेज सांगतो. फेसबुकवरही अनेक युजर्स हा मेसेज पोस्ट करीत आहेत.

Fact Check: बिबट्या पुणे किंवा नागपूरला नाही तर कर्नाटकाच्या गदग मध्ये दिसला, दिशाभूल करीत व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हाट्सअप वर बिबट्याचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. काही युजर्स हा बिबट्या पुण्याजवळील भोसरी येथे दिसला असे सांगत हा व्हिडीओ शेयर करीत आहेत. तर काही युजर्स हा व्हिडीओ नागपूर जवळच्या कोरडी येथे सापडला आहे. असे सांगत आहेत.

Fact Check: विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले की पुलवामा हल्ला हा भाजपचा विचारपूर्वक डाव, खोटा संदेश होतोय व्हायरल

पुलवामा हल्ला ही भाजपची विचारपूर्वक केलेली कृती किंवा डाव होता असे विधान विंग कमांडर अभिनंदन ने केले आहे. असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबुकवर हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून युजर्स एका पेपर कटिंग चा हवाला देत आहेत.

Fact Check: आप्पासाहेब धर्माधिकारी पत्राद्वारे म्हणाले ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार परत करणार? खोटा आहे तो दावा

महाराष्ट्रातील ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार दिला. या कार्यक्रमात उष्माघाताने काहींचा मृत्यू झाला. यानंतर खुद्द आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी झालेल्या प्रकाराला कंटाळून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सरकारला परत करणार असे म्हटले आहे. असा दावा या पत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Weekly Wrap: टाकी फुल केल्यास स्फोट, विवेकानंदांचा दुर्मिळ व्हिडीओ ते महिलांना मोफत शिलाई मशीन पर्यंत प्रमुख फॅक्ट चेक

मागील आठवडाही अनेक खोट्या दाव्यान्नी गाजला. स्वामी विवेकानंद यांचे दुर्मिळ व्हिडीओ फुटेज सापडले असा एक दावा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शहर पूर्णपणे पाणीविरहित झाल्याचा दावा करण्यात आला. सरकार देशातील गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे. गाडीच्या टाकीत फुल्ल इंधन भरल्यास स्फोट होतो असे दावे करण्यात आले. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: उन्हाळ्यात इंधन टाकी फुल केल्यास गाडीचा स्फोट होतो? खोटा दावा होतोय व्हायरल

उन्हाळ्याचा कडाका वाढत आहे तसाच एक मेसेज मोठ्याप्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. इंडियन ऑइल या इंधन विक्रीक्षेत्रातील कंपनीचा हवाला देऊन हा दावा केला जात आहे.

Fact Check: देशभरातील गरीब महिलांना सरकार देत आहे मोफत शिलाई मशीन? खोटा आहे हा दावा

देशभरातील गोरगरीब महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सरकारने मोफत शिलाई मशीन देण्याची योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घ्या असा दावा सध्या केला जात आहे. नोकरी आणि व्यवसाय संदर्भातील माहिती देणाऱ्या काही वेबसाईट्स वर यासंदर्भातील बातम्या फिरू लागल्या आहेत.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read