Tuesday, September 17, 2024
Tuesday, September 17, 2024

Monthly Archives: August, 2024

Weekly Wrap: चार किडनी उपलब्ध, टेलिग्रामवर बंदी ते महिलांसाठी मोफत राईड पर्यंतचे प्रमुख फॅक्टचेक

ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडासुद्धा सोशल मीडियावरील व्हायरल फेक दाव्यांनी गाजला. अपघातात जखमी दांपत्याच्या चार किडनी उपलब्ध असून दान करायच्या आहेत, असा दावा करण्यात आला. लष्करातील शहीदाचा मुलगा भावनिक गाणे सादर करताना, असा दावा करण्यात आला. काँग्रेस नेत्याच्या मणिपूर दौऱ्यात ‘गो बॅक राहुल गांधी’च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात आला. भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातली आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी रात्री मोफत राईड योजना सुरू केली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

फॅक्ट चेक: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी रात्री मोफत राईड योजना सुरू केली आहे? खोटा आहे हा दावा

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी रात्री मोफत राईड योजना सुरू केली आहे, असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातलेली नाही, खोटा दावा झाला व्हायरल

भारत सरकारने टेलिग्रामवर बंदी घातल्याचा दावा करत झी न्यूजचे एक ग्राफिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तपासात आम्हाला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

फॅक्ट चेक: मणिपूरमध्ये ‘गो बॅक राहुल गांधी’ आंदोलन? नाही, आसाममधील जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह होतोय शेअर

मणिपूरमध्ये ‘गो बॅक राहुल गांधी’ आंदोलन असे सांगत एका स्थानिक भोजनालय असल्यासारखे दिसणाऱ्या ठिकाणावरून जात असताना काँग्रेसचे नेते आणि एलओपी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत असलेल्या विरोधकांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

फॅक्ट चेक: Mpox यापुढे जागतिक आरोग्य धोका नाही? WHO प्रमुखांचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने होतोय शेअर

WHO चे महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेयसस हे Mpox “यापुढे जागतिक आरोग्यावर धोका नाही” अशी घोषणा करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला जात आहे.

फॅक्ट चेक: लष्करी शहीदाचा मुलगा भावनिक गाणे सादर करताना असे सांगणाऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये दुसराच आहे

लष्करी शहीदाचा मुलगा भावनिक गाणे सादर करताना असे सांगत एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात शेयर केला जात आहे. त्या व्हिडिओसोबत असणारी कॅप्शन सांगते की, "फक्त शांत एकट्या मध्ये ऐका, खूप हृदयस्पर्शी..... हा मुलगा एका लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचे वडील दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत मारले गेले.

फॅक्ट चेक: चार किडनी उपलब्ध असल्याचा मेसेज जुना आणि खोटा आहे, जाणून घ्या सत्य

चार किडनी उपलब्ध असे सांगत एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातात जखमी दांपत्याच्या चार किडनी उपलब्ध असून दान करायच्या आहेत, असे हा मेसेज सांगतो.

Weekly Wrap: ध्वज फडकविणारा पक्षी ते 24 मुलांची आई पर्यंत व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा धुमाकूळ झालाच. केरळच्या एक गावात पक्षाने राष्ट्रध्वज फडकविला असा दावा करण्यात. यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा करण्यात आला. राहुल गांधी विवाहित असून आपली विदेशी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेले असल्याचे छायाचित्रात दिसत आहे, असा दावा करण्यात आला. एक व्हिडिओ कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार पीडितेशी संबंधित आहे, असा दावा करण्यात आला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव अश्रफ हुसेन असून त्याला नागरिकांनी चोपला, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्ट मध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: बदलापूर येथील शाळा तोडफोडीचा व्हिडीओ खोट्या कम्युनल दाव्यांसह होतोय व्हायरल

एक जमाव एका दाढीवाल्या वयस्क व्यक्तीस मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदलापूर येथे झालेल्या शाळकरी मुलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अश्रफ हुसेन याला नागरिकांनी चोपला असे सांगत हा व्हिडीओ शेयर केला जात आहे.

फॅक्ट चेक: विशाखापट्टणममध्ये वडिलांनी मृत मुलाचे अवयव दान केल्याचा व्हिडिओ कोलकाता बलात्कार पीडितेशी जोडून व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक स्ट्रेचर ओढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार पीडितेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read