Monday, February 10, 2025
Monday, February 10, 2025

Monthly Archives: January, 2025

फॅक्ट चेक: जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती म्हणून फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या, ही अफवा आहे

जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती म्हणून फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या असे आवाहन प्रारंभी पुणे आणि आता मुंबई महानगरपालिकेने केल्याचा दावा केला जात आहे.

हा व्हिडिओ अमृतसरमध्ये आंबेडकरांचा पुतळा फोडणाऱ्या तरुणाला झालेल्या मारहाणीचा नाही

हा व्हिडिओ अमृतसरचा आहे, जिथे वकील आणि स्थानिक लोकांनी आंबेडकरांचा पुतळा तोडणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली.

फॅक्ट चेक: ‘महावाचन उत्सव’ चे असंख्य चुका असलेले व्हायरल प्रशस्तिपत्रक एडिटेड आहे

'महावाचन उत्सव' चे असंख्य चुका असलेले प्रशस्तिपत्रक असे सांगत एक प्रशस्तिपत्रक असलेला दावा चांगलाच व्हायरल झाला आहे. आम्हाला हा दावा X आणि Facebook वर मोठ्याप्रमाणात व्हायरल असल्याचे निदर्शनास आले.

महाकुंभात पकडल्या गेलेल्या दहशतवाद्याचा असे सांगत व्हायरल झालेला हा फोटो AI निर्मित आहे

चित्रात दोन पोलिस एका साधूला पकडलेले असल्याचे दिसत आहेत. साधूचे हात दोरीने बांधलेले आहेत. हा फोटो शेअर करताना महाकुंभात पकडल्या गेलेल्या दहशतवाद्याचा असे सांगत असा दावा करण्यात आला आहे की, महाकुंभात दहशतवादी अयुब खानला अटक करण्यात आली आहे.

Weekly Wrap: महाकुंभात बिल गेट्सची उपस्थिती ते आढळलेल्या १०० फुटी सापापर्यंतच्या दाव्यांचे फॅक्टचेक

जानेवारी महिन्याच्या चौथ्या आठवड्यातही अनेक फेक दावे करण्यात आले. एका व्हिडिओच्या माध्यमातून अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना, असा दावा करण्यात आला. आणखी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आली, असा दावा करण्यात आला. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स महाकुंभाला उपस्थित होते, असा दावा करण्यात आला. महाकुंभात १०० फूट लांबीचा साप आढळला, असा दावा झाला. एक चित्र शेयर करीत चित्तोडगड शाळेच्या प्रकरणात निलंबित झालेल्या शिक्षिकेचा फोटो असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: महाकुंभात १०० फूट लांबीचा साप आढळला? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्याचे असल्याचे सांगणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महाकुंभमेळ्यात नदीत १०० फूट लांबीचा साप आढळला असा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स महाकुंभाला उपस्थित होते का? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांनी महाकुंभात भाग घेतल्याचा दावा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

फॅक्ट चेक: प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक असे सांगत सहा महिने जुना व्हिडीओ व्हायरल

प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चालत्या रेल्वेवर काही व्यक्ती दगडफेक करताना दिसून येत आहेत. महाकुंभ साठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला या आशयाने हा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना असे सांगणारा व्हिडीओ AI जनरेटेड आहे

अग्निशामक दलाचे जवान लॉस अँजेलिस मधील आगीतून प्राण्यांना वाचविताना असे सांगणारा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रचंड आगीतून काही प्राण्यांना गणवेश घातलेले जवान वाचवत असल्याचे व्हिडिओत दिसते.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read