Authors
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असंख्य दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असा दावा झाला. MVA नेत्या सुप्रिया सुळे, नेते नाना पटोले आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणाशी संबंधित बिटकॉइन्सबद्दलच्या ऑडिओ नोट्स, असा दावा करण्यात आला. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 1992 च्या दंगलीत पक्षाच्या सहभागाबद्दल मुस्लिम नेत्यांची माफी मागितली, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे, असा दावा करण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६२ वर्षे करण्यात आली, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढले आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डचा दावा?
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
बिटकॉइन एक्स्पोज मधील ऑडिओ नोट खऱ्या आहेत?
MVA नेत्या सुप्रिया सुळे, नेते नाना पटोले आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणाशी संबंधित बिटकॉइन्सबद्दलच्या ऑडिओ नोट्स, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.
1992 च्या दंगलीबद्दल उद्धव ठाकरेंनी मुस्लिम नेत्यांची माफी मागितली?
शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 1992 च्या दंगलीत पक्षाच्या सहभागाबद्दल मुस्लिम नेत्यांची माफी मागितली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे?
केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६२ वर्षे करण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढले?
महाराष्ट्र निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा