Claim–
சீனாவில் ஒட்டுமொத்தமாக பன்றிகள் அழிப்பு.கரோனா வைரஸ் தாக்குதலில் எதிரொலி ???
अनुवाद-
चीनमधील सगळ्या वराहांना मारले जात आहे. कोरोना व्हायरसच्या भितीमुळे तर हे केले जात नाही ना ?

Verification–
आम्हाला व्हाट्एसप वर एक तमिळ मेसेज मिळाला यासोबत एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत अनेक ट्रकमध्ये डुकरे असून या डुकरांना नंतर एक मोठ्या खड्ड्यात जेसीबी मशीनच्या साहाय्याने पुरण्यात येत असल्याचे दिसत आहे. मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की चीनमध्ये कोरोन व्हायरस चा प्रादुर्भाव झाल्याने डुकरांची अशी सामूहिक हत्या करण्यात येत आहे.
आम्ही याबाबत तपासणी करण्याचे ठरविले. याबाबत शोध सुरु केला असता आम्हाला एक ट्विट आढळून आले यात हा व्हिडिओ शेअर कऱण्यात आला आहे. यात म्हटले आहे की चीन अफ्रिकन स्वाइन फेवरशी लढ़त आहे. हा व्हिडिओ 2018 मधील आहे.
Walka z #ASF w #China. Film wykonano w 2018 roku.
Szok!pic.twitter.com/weFPA1QtgM— Magda M (@modliszka30) January 29, 2019
यानंतर आम्हाला आणखी एक ट्विटमध्ये हा व्हिडिओ आढळून आला. या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, जेव्हा प्राण्यांना वस्तू म्हणून अशी वागणूक मिळते तेव्हा ते खूप गंभीर असते. तेव्हा आपल्या थाळी प्राण्यापासून तयार होणारे उत्पादने नसावी अशी सगळ्यांना विनंती करा. हे ट्विट देखील गेल्या वर्षी करण्यात आले आहे.
When animals are looked at like mere objects, this is the horrific treatment they go through.
Please make the compassionate choice to leave all animal products off your plate. pic.twitter.com/McXeCfTEMQ
— julie marie cappiello Ⓥ (@jmcappiello) September 14, 2019
यांडेक्सच्या साहाय्याने शोध घेतला असता एका यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आढळून आला.
तसेच आणखी एका यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ गेल्यावर्षी अपलोड कऱण्यात आला होता.
यानंतर आम्हाला मागील वर्षीचे एक आर्टिकल आढळून आले यात हे व्हायरल व्हिडिओतील फोटो आढळून आले. आर्टिकलचा अनुवाद केला असता यात म्हटले आहे की, ओखनहा मोंगच्या फेसबुक पोस्टनुसार चीनध्ये एक वराह फार्म मध्ये 30000 डुकरांना फेकून देण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार 40 हजार डुकरांसहित तीन मोठ्या वराह फार्मनी डुकरे दफन केली आहे. चीनध्ये अफ्रिकन स्वाईन फेवर नावाच्या संक्रमक आजाराने डोके वर काढले असून अनेक वराह फार्म वराहांचे दफन करत आहेत.

यावरुन हेच स्पष्ट होते की हा व्हिडिओ सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरस आल्याने वराहांच्या दफनाचा नाही तर मागील वर्षी अफ्रिकन स्वाईन फेवर नावाच्या संक्रमक रोग परसरल्याने चीनमधील वराह फार्मने वराहांचे दफन केले त्याचा आहे. आजच्या संदर्भात हा व्हिडिओ व्हायरल करुन भ्रामकता निर्माण केली जात आहे.
Sources
Twitter Advanced Search
Google Search
Google Reverse Image
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)